असे वचन शतपथ ब्राह्मणात आहे (७/२-२-६) गाईचे शेण महत्त्वाचे खत असल्याचे लोक जाणत होते. या शेणामुळे पृथ्वीला रस प्राप्त होतो असा संदर्भ मिळतो.
'तदस्या एवैनमेतत् पृथ्विव्ये रसेव समर्घयति । तस्मादा खुकरिषम् संभरति पुरुष्यं इति । पुष्टीः पशवः ।' अशी वचने शतपथ ब्राह्मणात आहेत. उपनिषदात आत्मा अन्नमय आहे. अन्नाची निंदा करू नये अशी वचने सापडतात. ऋग्वेदात यवाचा उल्लेख आहे परंतु तांदळाचा नाही. ब्राह्मणकाळात 'शस्यम्'चे तांदळाचे संदर्भ आहेत. अथर्ववेदात प्रथिरैन्याने नांगर शोधल्याचा उल्लेख आहे. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांनीही शेतीत योगदान दिले. मात्र चक्र आणि नांगर यांचा वापर सुरू झाल्यापासून स्त्रियांचे शेती या व्यवसायातील महत्त्व कमी कमी होत गेले असावे असे वाटते. मुदगलानी या स्त्रीने स्वतःला जुंपून नांगर चालवला होता. लोपामुद्रेने अगस्ती ऋषींच्या हातात फावडे देऊन शेतात काम करण्यास प्रवृत्त केले होते. वैदिकादी गोपालक टोळ्या आणि द्रविडादी गणसत्ताक कृषिजीवी टोळ्या यांचा संकर होताना कृषि आणि पशुपालन हे दोनही व्यवसाय एकमेकांना पूरक झाले असावेत.बीजाच्या महत्त्वाची जाणीव लोकमानसात रुजली. 'लिंगपूजेत' बीजाच्या स्वयंभू महत्त्वाचे भान लोकांना नव्हते. परंतु सूर्यपूजेच्या रूपाने ते आले. बीज रुजण्यासाठी खोलात पडावे लागते. तेथे रुजावे लागते. सूर्याची उष्णता जमिनीत रुजते. किरणांच्या रूपाने सूर्य बीजरूपाने धरणीच्या गर्भाला चेतना देतो अशी श्रद्धा लोकमानसात निर्माण झाली.
अपागर्भ सूर्य -
सूर्य हा जलाचा फार मोठा साठा आहे. ही कल्पना फार प्राचीन आहे. "आप : सूर्ये समाहितकाः" (तैत्तिरीय अरण्यक, १.८.१) सूर्य हा धन्वन्तरी असून त्याचे बिंब हा त्याचा कलश आहे. सूर्य कलशातून बाहेर पडणाऱ्या जलात औषधीगुण असतात व त्याने रोग नष्ट होतात ही कल्पना फार प्राचीन आहे. सूर्याचा डोळा वर्षनशील जळाने परिपूर्ण आहे. २'सूर्यस्य चक्षू रजसैत्यावृत्तम्' (ऋ. १.१६४.१४) याचाच अर्थ असा की पृथ्वीवर अभिषिक्त होणारे वृष्टिजल हे सूर्यमंडलातून येते. या वृष्टिजलाने भूमी सुपीक होते. सूर्याला 'अपागर्भ' म्हटले आहे. (१:१६.४.५२)
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२८
भूमी आणि स्त्री