पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना दुर्गाबाई भागवत लिहितात, "जगाच्या कुठल्याही खंडात जा, युरोपात, अमेरिकेत कुठेही जा, भाषा बदलली की संस्कृती बदलते. म्हणजेच संस्कृतीचे मूळ भाषा असते, पण या विस्तीर्ण भूभागात तीन भिन्न भाषा असूनही संस्कृती एकरूपच आहे." (महाराष्ट्र, आध्र, कर्नाटक, तमिळनाडू हे तीन भूभाग) भारतीय संस्कृतीत भाषा 'गौण' आहे. तिच्यातील विविध प्रांतांतील लोकपरंपरांत भाषा वेगळ्या असल्या तरी चकित करणारी एकात्मता आहे. या संदर्भात दुर्गाताई स्पष्टपणे नोंदवितात की "आमच्याकडचे समाजशास्त्रज्ञ बहुशः पाश्चात्य सरणीचे समाजशास्त्र मानीत आले आहेत. त्यामुळे भाषा भिन्न असूनही संस्कृती समरूप असू शकते हे प्रमेय या तीन प्रांतांच्या आधारे अजून कुणी मांडायला धजत नाही' आणि म्हणूनच ताराबाईंनी 'अनुबंध' च्या रूपाने योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे असे त्यांना वाटते. डॉ. ताराबाईचे हे पाऊल किती योग्य दिशेने आहे याची जाणीव भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेल्या विधी, सण, उत्सव, व्रते आदींचा अभ्यास करताना सतत होत राहते. महाराष्ट्रातील, कर्नाटकातील चैत्रीगौर तृतीयेला विराजमान होते तर राजस्थानातली चैत्रगौर चैत्रतृतीयेला विसर्जित होते. त्यामागील हेतूही समान आहेत. चैत्रातील विधी, उत्सवांच्या चर्चेच्या वेळी त्यांचा साकल्याने विचार होईलच.
भूमी आणि भाकरीला नसते जात नसतो धर्म -
गेल्या हजारो वर्षांपासून भारतात, संस्कृति प्रधान असून भाषा गौण आहे. समन्वय हा या संस्कृतीचा आत्मा आहे. या दोनही भागांत... उत्तर दक्षिण भारतात भाषिक वेगळेपणा असला तरी लोकपरंपरांत अंगभूत सारखेपणा... साम्य आहे. या देशावर हजारो वर्षांपासून अनेक टोळ्यांनी आक्रमण केले. द्रविड, पणिन, दास, दस्यू, आर्य, शक, हूण, कुशाण... अनेक. गेल्या हजार वर्षांत मुस्लिम, ख्रिस्ती आले. परंतु आलेले समाज या भूभागातच स्थिरावले. या भूभागातील नैसर्गिक समृद्धी हे यामागचे कारण आहे. तसेच भारताच्या तीन बाजूंनी विशाल सागर आणि उत्तरेकडे पूर्वपश्चिम पसरलेल्या उत्तुंग हिमालयाच्या घनदाट रांगा, या सीमा पार करणे आलेल्या टोळ्यांना दुरापास्त होते. या नैसर्गिक एकसंधतेमुळे या भूमीत स्थिरावलेल्या टोळ्यांतील संघर्ष, स्वीकृती, समन्वय, समरसता यातून सातत्याने सुरू असलेल्या नवस्वीकृती (Agglomeration) प्रक्रियेतून सांस्कृतिक एकात्मता निर्माण झाली. इस्लाम,
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३०
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
२२५