पान:भूमी आणि स्त्री.pdf/१९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली

 सर्वाना आनंदाचे प्रतीक म्हणून साखर वाटली जाते. लक्ष्म्यांच्या डोक्यावर पडवळ, भोपळा वा केवडा ठेवतात. देशमुख समाजात काही घरांतून त्यांना मूळ पाठविले जाते. मूळ पाठविताना गोड दशम्या, गुळाचा खडा तुळशीसमोर बांधून ठेवतात. तिथून लक्ष्म्या घरात येतात. सूप हे समृद्धीचे आणि शुद्धीचे प्रतीक आहेच. मूळ पाठविताना हळदकुंकवाच्या पुड्या, खोबऱ्याची वाटी शिदोरीत ठेवतात.
 लक्ष्मी घरभर हिंडते, अंगण, ओसरी,माडी, गुरांचा गोठा सगळीकडे जाते.

लक्ष्मीबाई आली आली
वसरी चढून माडी गेली
भक्ताला हाक दिली
लक्ष्मीबाई आली आली

 लक्ष्म्या जेवतात त्या दिवशी -
 लक्ष्मी सायंकाळी येते. त्या रात्री तिला भाजीभाकरी आणि ठेच्याचा नैवेद्य असतो. अनेक शेतकरी घरांतून ज्वारी बाजरीच्या मिसळ पिठाची भाकरी व ठेचा करतात.

सरीला सरावन भादवा आनंदाचा
आशा पाठमोरी मुऱ्हाळी सुखाचा...
पाऊस पडला चिकूल झाला
वहात आली गंगा...
पेरिला मका धान्य लाल तूरी
पावनीला वाढा भाजी ठेचा भाकरी....

 दुसरा दिवस सर्वात महत्त्वाचा. लक्ष्म्या जेऊघालणे महत्त्वाचे. सर्वसाधारणपणे लक्ष्म्यांचे जेवण सायंकाळी वा दुपारनंतर असते. या दिवशी सकाळी काहींच्या घरी

१८६
भूमी आणि स्त्री