नवस्वीकृतीची ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीची अभिजातता अधिकाधिक समृद्ध झाली आहे. आज जग २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना या सांस्कृतिक एकात्मतेचा प्रत्यय कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून ते द्वारकेपर्यंतच्या लोकपरंपरांतून सातत्याने येत असतो.या विविधरंगी विशाल देशात वीसहून अधिक प्रमुख भाषा आणि शेकडो बोली बोलल्या जातात. त्या सलोख्याने नांदतात. ही सांस्कृतिक अंगाची एकता भाषांमधूनही जाणवते. भाषाकुळाची प्रस्थापित कुंपणे ओलांडून भाषा एकमेकींच्या शब्दवैभवात सहजपणे स्थिरावल्या आहेत केवळ भाषा नव्हे तर मिथक कथा, सण, व्रते, विधी, उत्सव, तत्संबंधी गाणी आदी लोकपरंपराही.
अन्नप्राप्ती : आदिम समाजाची मूलभूत समस्या : त्यातून सर्जन शक्तीची आराधाना-
जगातील सर्व आदिम, अर्धसंस्कृत व सुसंस्कृत धर्मांमध्ये प्रजा, पशू, धान्य यांच्या समृद्धीसाठी सुफलीकरण विधी करणे आवश्यक मानले जात असे. अन्नप्राप्ती ही आदिम समाजाची अत्यंत मूलभूत समस्या होती. विश्वात मृत्यूचे म्हणजे भुकेचे साम्राज्य होते. अन्नप्राप्तीसाठी आदिम समाजाने सामूहिक प्रार्थना केल्या, उपासना केली. अन्न ही समस्या केवळ मानवाचीच नव्हे तर मानवाने स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानलेल्या देवांसमोरही होती. ही समस्या देवांनी छंद, वाणी, समूहगान याद्वारे दूर केली व मृत्यूचे भय नाहीसे केले.छंदवाणी, सामगानात यात्वात्मक सामर्थ्य असते व त्यातून विपुल प्रमाणात अन्नप्राप्ती होते अशी श्रद्धा मानवात निर्माण झाली. सर्जनाच्या, अन्ननिर्मितीच्या समस्येतून त्यांच्या दैवत कल्पना, श्रद्धा साकारत गेल्या. आदिम संस्कृतीच्या अध्ययनातून सिद्ध झाले आहे की, त्या काळात योनी, लिंग, स्तन हे मानवी अवयव सुफलताविधीची प्रतीके मानली जात. आजच्या अर्थाने धर्म ही संकल्पना मानवी मनात रूजली नव्हती. साकारलेली नव्हती. त्याकाळात लोक समूहांच्या मनांत सर्जनाशी जोडलेल्या या मानवी अवयवांबद्दल भीतीयुक्त श्रद्धा होत्या. मानव जन्मास पुरुषही कारण असतो या बाबत आदिम लोक समूहांच्या मनात जोपर्यंत सांशकता होती, अज्ञान होते, तोपर्यंत विश्वांच्या आणि जगातील जीवन उपयोगी पदार्थांच्या उत्पतीचे कारण मातृत्वात पाहिले गेले. मातृत्वातील सर्जनशक्तीचे उन्नयन होऊन 'आदिमातेची' संकल्पना निर्माण झाली. मातृसत्ताक
पान:भूमी आणि स्त्री.pdf/१९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
भूमी आणि स्त्री