जाई. 'वृषं लुनाति स वृषलः' बैल - वृष फोडण्याचे गर्ह्य काम करणारा तो वृषल. वृषल हा शब्द शूद्रांसाठी मन्वादिस्मृतींतून वापरला आहे. स्त्रिया सर तयार करून कुदळ फावड्याच्या साहाय्याने शेती करीत.
वरील विवेचनावरून असे लक्षात येते की ऋषिपंचमीचा संबंध 'ऋषी' या शब्दाशी वा संकल्पनेशी नसून ११'वृषी' या संकल्पनेशी असावा 'वृष' ह्या शब्दाचा अर्थ कल्याणकारक गोष्टींचा वर्षाव करणारा असा धर्मवाचकही झाला. या व्रताचा मूलबंध लिंगपूजक, मातृसत्ताक समाजाशी असावा. या दिवशी स्त्रिया बैलांच्या श्रमाने निर्माण झालेले धान्य वा कंदमुळे खात नाहीत. 'मुळात वृषिपंचमी असून त्या मागील कल्पनेचा व त्यासंबंधीच्या माहितीचा कालांतराने लोप होऊन तिची जागा ऋषिपंचमीने घेतली असावी.'
परिवर्तनाच्या काळातील संघर्ष : तरीही 'आदिबंध' बोलके -
१२मार्शलच्या मते मातृसत्ताक संस्कृतीचे अवशेष आजच्या भारतीय जीवन पद्धतीतून दिसतात. १३स्टारबकला वाटते की 'स्त्री' ला मिळालेला सन्मान शेतीप्रधान अर्थ व समाजव्यवस्थेतून मिळाला आहे. पूर्व वैदिक काळात शेतीबद्दलचे, त्यातून मिळणाऱ्या शाकभाज्यांचे महत्त्व समाजास मान्य होते. शेतीशी निगडित देवतांना महत्त्व होते. बैलांचा नांगर वापरात येईपर्यंत स्त्री समाजाचे केन्द्रस्थानी होती. शेती आणि स्त्रिया यांच्या संदर्भात काही उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेदात सापडतात. मुदगलानी ही स्वतः नांगर चालवणारी, शेती करणारी स्त्री होती. अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा हिने आपल्या आळशी पतीच्या हातात फावडे देऊन शेतीकामाला लावले. वैदिकांची संस्कृती आणि पुरुषप्रधान अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था दृढ होतांना, समाजाला स्मृतींच्या... नियामांच्या माध्यमातून नियंत्रित करताना मातृसत्ताक गणसमाज आणि पुरुषसत्ताक समाज यांत संघर्ष झाला असावा. त्यातून स्त्रियांना सर्वार्थाने दुय्यम करणाऱ्या तीन दुष्ट प्रथा आस्तित्वात आल्या. १.बहुपत्नित्व, २.बालविवाह, ३.सतीची प्रथा. ब्राह्मणी काळात स्त्रीला सर्वाधिकारांपासून वंचित करण्याचे काम नियमबद्धपणे केले गेले. रेनफेलच्या मते हे काम ब्राह्मण काळात झाले. ऋग्वेद, अथर्ववेदात पुरुषमेध,
पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८७
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८२
भूमी आणि स्त्री