Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महाराष्ट्रातील अनेक अदिवासींच्या देवता-प्रमुख देवता, धरित्री आणि कणसरी या आहेत. विदर्भाच्या उत्तरेकडील डोंगर पठारांवर राहणारे कोर्कू पोळा साजरा करतात. बैलांना या दिवशी भरपूर पाण्यात नेऊन स्वच्छ धुतात. त्यांच्या शिंगांना बाशिंगे बांधून सजवतात आणि त्यांना भरपूर पळायला लावतात. चरायला नेतात.
 सातपुड्यातील निळीचारीची पूजा -
 सातपुड्यात राहणारे वळवी, गवित, वडवी, वसावे या कुळातील भिल्ल निळीचारीची पूजा करतात. ती पोळ्यासारखीच असते. ही पूजा मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर रानभर गवताची दाट झूल बहरल्यावरच करतात. पूजेच्या आदल्या दिवशी बैलांना स्वच्छ धुतात. शेतात नेऊन चारतात. सायंकाळी गावातील सर्व पुरुष औत हाकायची काठी पराणी घेऊन एकत्र जमतात. सर्व पराण्या एकत्र करून त्यांची पूजा करतात. ही पूजा केल्याशिवाय जनावरे हिरव्या रानात गवतात चारीत नाहीत. तसे केल्यास अघटित घडते अशी त्यांची समजूत असते.
 पर्जन्य वर्तविणाऱ्या पक्षांपैकी एक भोजा. त्याने पोळ्याच्या आधी आठदहा दिवस मौन पाळले तर पिकांना अखेरच्या पावसाचे पाणी मिळणार नाही असा समज आहे. तर पोळ्याच्या सणानंतर हे मौन घडले तर मात्र भरपूर पाऊस पडेल असे मानतात.
 ऋषिपंचमी -
 मातृहक्क : नैसर्गिक जीवन व्यवस्था -
 सर्व मानववंशशास्त्रज्ञांचे एकमत आहे की 'मातृहक्क' ही सर्वात जुनी आणि मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या काळातली नैसर्गिक व्यवस्था होती. उत्पादन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, नातेसंबंधाचे निश्चितीकरण त्यातून आकारास आलेली कुटुंबसंस्था यांच्याबरोबर मातृसत्तेचे रूपान्तर पितृसत्तेत झाले. वस्त्र विणण्याची, धागा तयार करण्याची कला, चिखलाचे मडके तयार करण्याची कला स्त्रीने निर्माण केली. परंपरेने पुढील पिढ्यांना दिली. धर्मानंद कोसंबी म्हणतात की शेतीचा शोध आणि मातृसत्ताक समाजव्यवस्था यांची निर्मिती भारतात प्रथम झाली. पूर्व वैदिक काळात पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या सुरुवातीच्या काळात

१८०
भूमी आणि स्त्री