Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 बैलाला सूर्याच्या दिशेने, पूर्वेकडे तोंड करून बांधा, सूर्य, वृषभ हे पौरूषाचे प्रतीक आहेत.

हौस मला मोठी कमानी दरवाजाची
हाईत उंचउंच शिंग माज्या बडूद्याची
बैला माज्या बडूद्यानं, इळाचं काय केलं
शेल्याला तास नेल, काळ्या मातीच सोन झाल
बैला माज्या बडूद्यानं, डरकी फोडली पेवात
धनी सावध वाड्यात
पोळ्याच्या दिशी चिरा पाडिला पाराचा
माज्या राघूबाचा नंदा जहागीरदाराचा

 बैल जसे कष्ट करून मातीतून सोनं काढतात, तसाच धनीही त्याच्या बरोबरीने कष्ट करतो. याविषयीची कृतज्ञता, प्रेम व्यक्त करताना पोळ्याच्या ओव्यांतून ती सांगते -

 गाडीमंदी पोती
 किसन बाळाच्या
 पाऊस राजान
 माज्या राघूबाचे
 पाऊस पान्याच्या
 माज्या राघूबानं
 गाडीमंदी पोती
 ववाळिते नंदी चारी

नंदी आले अंबाराला
किल्ल्या गेल्या कंबराला
पडून बरे केले
नंदी तासाला पाणी पेले
अंगनी उतरल्या धारा
जिमिनी केल्या तारा
नंदी आले पेवादारी
माझा पाचवा गल्ला करी

 हा पाचवा म्हणजे शेतकरणीचा धनी. त्यातल्या 'माझा पाचवा' या शब्दाचे भावसौंदर्य शब्दातीत आहे.
 पंचपल्लवांनी पूजा -
 बैलांच्या पूजेत पंचपल्लव असतात. दुर्वा, आपटा, बेल, रुचकी, आंबा यांची पाने लागतातच. श्रावण, भाद्रपदातील सणांमधून माणसाचे निसर्गाशी असलेले

१७८
भूमी आणि स्त्री