पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माहेरबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. उत्तरेत धाकटी नणंद, धाकटी बहीण, लेक यांच्याकडचा आहेर स्वीकारणे निषिद्ध मानेले आहे. वरील बाबींचा विचार करता असे लक्षात येते की द्रविड आणि आर्य संस्कृती.... मातृसत्ताक आणि पितृसत्ताक संस्कृतीचा संगम मऱ्हाटी संस्कृतीत झाला आहे.
 पोळा : बैलांच्या श्रमांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण -
 शेतीच्या कामात बैलाला फार महत्त्व आहे. भर उन्हाळ्यात, पावसात, काकडणाऱ्या थंडीत शेतीची मशागत करण्यासाठी बैल सतत श्रमत असतात. बैलांशिवाय शेतीची मशागत होत नाही. आज यंत्रयुग आले आहे. ट्रॅक्टरच्या काळातही बैलांविषयीची कृतज्ञता सर्वसामान्य समाजात, विशेष करून कृषिसमाजात असतेच. जे आपल्या उपयोगी पडते, किंवा ज्यांचा आपल्यावर उपकार होतो, त्यांची मनोभावे पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही भारतीय लोकमनाची विशेषता आहे. उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सजीव असोत वा निर्जीव त्यांचे ऋण भारतीय मन मानते. पूजा, कृतज्ञता, झाडांची असते, प्राणिमात्रांची असते, शस्त्रांची असते, साधनांची असते.
 विविध टोळ्या भारतात येण्यापूर्वीपासून भारतीयांना कृषिविद्या अवगत होती. ऋग्वेद आणि अथर्ववेदात कृषिविषयी अनेक उल्लेख आढळतात. शेतीसाठी बैल व नांगराचा उपयोग त्यांना माहीत असावा. क्षेत्रपती, सीता व शुनासीर यांना उद्देशून रचलेले एक सूक्त ऋग्वेदात आहे. त्यातून आर्यांचे कृषिविषयक विचार व्यक्त होतात.

 

शुनं वाहाः शुनं नरः शुनं कृषतु लाङगल् ।
शूनं वस्त्रा वध्यन्तां शुनमष्ट्रामुदिड:गय ॥
शुनासीराविमां वाचं जुषेथां यद्दिवी चक्रयुःपयः ।
तेनामुप सियतम ॥
अर्वाची सुभगे भव सीते वन्दामहे त्वा ।
यथा नः सुभगासासि यथा नः सुफलाससि ॥

 अर्थ -बैल आनंदाने, लोक मजेने आणि नांगर सहज रीतीने नांगरोत. त्यांच्या जुंपण्या घट्ट बांधा. पुढे सुखोत्पती व्हावी म्हणून आता आसूड चालवा. शुनासीर हो

१७२
भूमी आणि स्त्री