भाजीपाला, कंदमुळे पिकविण्याचे प्रयोग त्यांनीच केले. पाऊस येण्यासाठी भूमीची उर्वराशक्ती वाढण्यासाठी, स्त्रिया सामूहिक प्रार्थना, विधी, प्रत्यक्ष जाऊन करीत. त्याचे अवशेष नागपंचमीच्या फेराच्या गीतांतून जाणवतात.
उत्तरेकडे नाग, पती, प्रियकर पुत्राच्या रूपातून येतो. महाराष्ट्रात मात्र नाग बंधूंच्या रूपातच येतो -
आदिम काळात मानवाचे जीवन प्राणिमात्रांप्रमाणे होते. प्राणिमात्रांत वंश पोटात असेपर्यंत व नंतर ते पिल्लू मातेचे दूध पिऊन स्वतःचे खाद्य स्वतः मिळवेपर्यंत त्याचे आणि मातेचे नाते असते. ते पिल्लू वयात आल्यावर ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला तिच्याशीही रत होते. माणूसही सुरुवातीच्या काळात असेच पशुवत जीवन जगला. इडिपस कॉम्प्लेक्समधून आई मुलाचे शारीरिक संबंध असण्याचा संकेत मिळतो. तर यमयमीच्या गोष्टीतून बहीणभावाचे शारीरिक संबंध वैध असण्याचा संकेत मिळतो. जैन रामायणानुसार राम आणि सीता बहीणभाऊ होते. मातृसत्ताक समाजव्यवस्तेत कोणत्या पुरुषाकडून संतती मिळवायची हे स्त्री ठरवीत असे. नागकन्या उलुपीने अर्जुनासारखा बलदंड व देखणा पुत्र मिळावा म्हणून अर्जुनाशी संग केला. ती अर्जुनाबरोबर श्वसुरगृही गेली नाही. सत्यकाम जबालीला मातेचे नाव माहीत होते. परंतु पित्याचे नाव मात्र माहीत नव्हते. या सर्व बाबींचे निरीक्षण करता असे लक्षात येते की स्त्री आणि पुरुष यांच्यातील अत्यन्त पवित्र नात्याची निर्मिती 'बंधू.... भ्राता' या नावे निश्चित झाली. हे नाते केवळ रक्ताचेच नसते तर हृदयस्थ भावनेचेही असते याची साक्ष द्रौपदी आणि श्रीकृष्ण, नाग आणि मऱ्हाटी स्त्री यांच्या कथाबंधांतून मिळते. नागाला कृषिकन्येने भाऊ मानले आहे. भाऊबीजही महाराष्ट्रात अत्यन्त भावपूर्णतेने साजरी होते. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या उत्तरेकडील प्रान्तात विवाहनांतर माहेरचा संबंध जवळजवळ तुटतो. लेकीच्या घरी वडीलबंधू, बहीण, आईवडील पाणीही पीत नसत. जेवले तरी ताटाखाली चांदीचे नाणे ठेवीत. 'कन्यादान' पुरुषप्रधान जीवन व्यवस्थेतून आले. महाराष्ट्रात मात्र मुलीकडे जेवायचे नाही, मुलीने आईला लुगडे नेसवायचे नाही अशा प्रथा नाहीत. उलट मंगळागौरीच्या ५ व्या वर्षी तांब्यात सोन्याचा नाग ठेवून त्याचे तोंड खणाने बांधून तो तांब्या आईला वायन म्हणून देतात. सुखाचा संसार झाल्यावर माहेर पूजण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. माहेरच्या सर्वांना स्त्री समाधानाने आहेर करते व
पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७६
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
१७१