पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वारूळाला येता का कुणी?
साऱ्या सयांत मिळवून आणल्या
आली आपल्या वाड्याला....

 मग सगळ्यांनी वारूळ पुजले. फेर धरला. पण चौथ्या पाचव्या फेराला भारजाचा हार तुटला. हाराचे मोती वेचता वेचता संध्याकाळ झाली. वाड्यावर आली तर कोणीही दार उघडेना. ज्याचे त्याचे एकच उत्तर. सासूचे, दीराचे, जावेचे आणि शेवटी पतीचेही उत्तर असे -

आमची कवाड सायाची (सागवानाची)
कुलपं निघना तांब्याची
एवढ्या रातच काय ग काज?
जा माहेरी कर जा राज!

 सासरचे काटेकुटे, त्यातही कधीमधी लाभणारी माया, पतीचे प्रेम या साऱ्याच अनुभवांचे आर्त स्वर ... समूहमनाचे आर्त स्वर पंचमीच्या सामूहिक उत्सवातून दरवळत असतात. ही कहाणी फक्त भारजाची नसते. तेल्यातांबोळ्यांच्या, ब्राह्मण, मराठा, दलित घरांतील सासुरवाशिणीची असते. तिच्या हृदयात रेंगाळणाऱ्या माहेरच्या ओढीबद्दलचा, सासरच्यांबद्दलचा, मनातला कांगावाही त्यात असतो, महाराष्ट्रातील नवविवाहित स्त्री मनोमन भावाला विनवीत असते.

बारा सणाला नेऊ नकोस
पंचमीला रे ठेवू नको....

 नागपंचमीची कथा -
 एक कथाबंध असा.एका घरात चार सुना असतात. तिघींना माहेर असते.एकीला मात्र माहेरची सावलीच नसते. या साय सावलीला आसावलेले तिचे मन पंचमी आली की खिन्न होई. शेषनागाच्या हे लक्षात आले. तो भाऊ होऊन या बहिणीकडे आला व तिला पंचमीस माहेरी चार दिवस आणले. तिचे माहरेपण केले. त्याकाळातच नागिणीला प्रसववेदना सुरू झाल्या. माहरेपणाला आलेल्या नणंदेने हातात दिवा धरला. परंतु त्या प्रसव वेदना आणि जन्म देतानाची तिची अवस्था पाहून नणंदेच्या

भूमी आणि स्त्री
१६१