पूजा लेकरंबाळं नेऊन केली जाते. झाडाखालील दगडांना लक्ष्मी मानून पूजा करतात. कणकेत गूळ घालून त्यांचे लहानलहान मुटके करून शिजवतात. त्यांना फळ म्हणतात. ही फळे झाडाखालील लक्ष्मीला वाहतात. वृक्षवल्ली वनस्पती, आणि कुळातील मुले हे समाजाचे घन आहे. याची जाण आदिमानवाला होती. त्या घनाची वृद्धी व्हावी, ही वृद्धी ज्या पर्जन्यामुळे होते तो पाऊस वेळेवर व योग्या प्रमाणात व्हावा, ज्या पर्जन्यामुळे वनस्पतीसृष्टी पुनश्च नव्याने बहरते, त्या पर्जन्याचे वनस्पतीसृष्टीचे तसेच कुलातील नव्या पिढीचे त्या ऋतूचे स्वागत करण्याची भूमिका या पूजेमागे असावी. तसेच भविष्यातील समृद्धीसाठी हा यातुविधी केला जात असावा.
ज्येष्ठ आषाढात पेरणीपूर्वी पेरणीचे साधन, तिफण उर्फ पाभर हिची विधिपूर्वक पूजा केली जाते. तिफणीची आरती प्रसिद्ध आहे. तिफण आणि शेतकरी शेतकरणीचे रक्ताचे भावबंध, वऱ्हाडातील कवी विठ्ठल वाघ यांनी हळुवारपणे उलगडून दाखवल्याने ही शेतातील 'तिफण' शहरातल्या घराघरातूनही पोहोचली आहे.
तिफण उर्फ पांभरीची पूजा -
पेरणीची तयारी ज्येष्ठापासूनच सुरू होते. वैशाखाच्या उन्हात जमीन भाजून निघते. त्यानंतर जमिनीची मशागत करण्यास शेतकरी सुरुवात करतो. वळीवाच्या सरींनी जमीन भिजते. पुन्हा ज्येष्ठाच्या धगीने भाजून निघते. या सरींमुळे आणि उन्हाच्या धगीमुळे जमिनीतील ऊर्जा वाढते. शेतात पाणी घालून शेतकरी शेत पेरणीसाठी सज्ज करतो. मृगाचा पाऊस पडताच शेतकऱ्याची पेरणीची धांदल उडते.
तिफणीची पूजा - मराठवाड्यात पेरणीपूर्वी तिफण ऊर्फ पाभर या पेरणीच्या पारंपरिक यंत्राची पूजा केली जाते. तिफण ऊर्फ पाभर म्हणजे पेरणी करतांना ज्यातून दाणे पेरले जातात ते साधन. तिफणीला तीन पोकळ नळे असतात. ते चाडाला म्हणजेच कुरीला जोडलेले असतात. पेरणीच्या वेळी तिफण औताला जोडतात.
तिफणीचे तीन दाते नांगरलेल्या जमिनीत घुसतात. त्यातून बियाण्याची बोळवण केली जाते. चाड ऊर्फ कुरीतून दाणे टाकले जातात.
शेतकरी समाजाच्या मनात हजारो वर्षांपासन रुजलेल्या श्रद्धा यंत्रयुगातही कमी झालेल्या नाहीत. पेरणीपूर्वी जमिनीच्या संदर्भात काहीना काही विधी केल्याशिवाय पेरणी करीत नाहीत. पाऊस झाल्यावर पेरणी करण्यापूर्वी शेतकरी सुताराचे घरी
पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४८
भूमी आणि स्त्री