हे पान प्रमाणित केलेले आहे.
रांगोळीचे दोन प्रकार -
रांगोळीचे आकृतिप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन महत्त्वाचे भेद आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात आकृतिप्रधान रांगोळ्यांचे प्रकार आढळतात तर भारताच्या पूर्व भागात - आसाम बंगालात वल्लरीप्रधान रांगोळ्या लोकप्रिय आहेत. प्रत्येक प्रांतात रांगोळीला विशिष्ट नाव आहे. तिच्या आकारचाही विशिष्ट प्रकार आहे.
राजस्थान - मांडना | गुजरात - साथिया | बंगाल - अलिपना |
महाराष्ट्र - रांगोळी | मध्य प्रदेश - चौक पूरना | आंध्र - मुग्गू |
केरळ - पुडिवाल | तामिळनाडू- कोलम | कर्नाटक - रंगोली |
१३४
भूमी आणि स्त्री