Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाळासारखे.चिलया चांगुणाच्या कथेतील कर्तव्यपरायणता, वात्सल्यावर मात करते असा संकेत देणारी आहे. या तान्हुल्या बाळाला सोन्याच्या चमच्याने दूध पाजवून मोत्याच्या गादीवर निजवून ही राणी बाळाला अंगाई गाते.

निजरे निजरे तान्हन बाळा
मी तर जाते सोनारवाडा
सोनारवाड्याचे दिवे जळे
लेकराची हसली गळे

 बाळ हसळी गळेपर्यंत रडते आहे. पाण्याच्या शोधात हिंडणारी राणी सोनारवाड्यात का जाते ? सोनारवाड्याचे दिवे रात्रभर का जळत आहेत ? तळ्याला पाणी लागावे, नदीला झरे फुटावेत म्हणून महाराष्ट्रातील अनेक आयांनी आपली तान्हुली तळ्यात, डोहात, विहिरीत अर्पण केली आहेत. काही कथांतून बाळबाळंतीण पाण्यासाठी बळी दिल्याच्या दंतकथा सापडतात.
 गाणे ४ -

काळा कोळसा झिक झिक वाणा
आंत बसला गुलोजी राणा
घाल घाल भुलाबाई विंझण वारा
घालता घालता लागला वेळ
आम्हाला द्या मांडुन खेळ
खेळात सापडली अधेली
अधेली देऊ वाण्याला
वाण्या वाण्या शोभा दे
शोभा माझ्या गाईला
गाई गाई दूध दे
दूध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या पंख दे
पंख माझ्या राजाला
राजा राजा घोडा दे
घोडे माझ्या बापाला
बापा बापा साडी दे

१२८
भूमी आणि स्त्री