पान:भूमी आणि स्त्री.pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  सरपदादा एकला जाई आंबा पिकला

  जाई नाही जुई नाही
  चिंचा तोडित जाय गो ...
  पालखीतली भुलाबाई

चिंचाखालची राणूबाई
 
शोपा मिरवीत जाय गो..

 'टोपी ' हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आजही शुभगोष्टींसाठी, विधीसाठी डोक्यावर टोपी आवश्यक मानतात. वरील ओळीत सर्प आणि आंबा यांचा उल्लेख एकत्र येतो. सर्प आणि आंबा यांचे साहचर्य कोठून आले असावे? सर्प आणि भूमी व सर्प आणि रजोद्रव्य यांचा अन्योन्य संबंध पुरातन काळापासून कल्पिलेला आहे. सर्पहा भूमिरक्षक आहे, तो पिकाचे रक्षण करतो, सर्पाच्या फणीवर पृथ्वी तोललेली आहे असे परंपरेने मानले जाते. सार्पा मुळे उंदीर घुशी या धान्य नष्ट करणाऱ्या प्राण्यांचा नायनाट होतो. त्यामुळे त्याला कृषिजीवनात सन्मानाचे स्थान आहे. नागपूजा आजही नागपंचमीच्या सणाद्वारे केली जाते. नागपूजा, विविध दैवतांसोबत नागाचे साहचर्य इ. संकल्पना सार्वत्रिकपणे आस्तित्वात होत्या आणि त्यांचे अवशेष आजही भारतीय संस्कृतीत आढळतात.
 सर्प हे पुरुषयोनीचे प्रतीक मानले जाते. सर्प स्वप्नात येणे हे'कामेच्छे'चे प्रतीक मानतात. जगातील अनेक मानवसमूहांत सर्पाचा आणि स्त्रीच्या रजस्त्रावाचा संबंध कल्पिलेला आहे. स्त्री वयात आल्यावरच मातृत्व धारण करू शकते. तद्वत् धरणीही रजस्वला झाल्यावरच धनधान्याची विपुल निर्मिती करू शकते. अशी कल्पना भारतातील सर्व भागांत अस्तित्वात आहे. 'अंबूवाची' हा उत्सव सर्वत्र साजरा होतो. रा. चिं. ढेरे यांनी 'लज्जागौरी' या संशोधनापर ग्रंथात 'अंबुवाची' उत्सवाचे विस्तृत विवेचन केले आहे. त्यात ते नमूद करतात की सर्प हा स्त्रीच्या रजःस्त्रावाला कारणीभूत असल्याची समजूत जगातील अनेक समाजात आहे.
 'बंगालमधील अंबुवाची'१० उत्सवातील एका यात्वात्म क्रियेत रजःस्त्राव आणि सर्प यांचा संबंध अगदी वेगळ्या स्वरूपात प्रतीत होतो. बंगलामधील लोक अंबुवाची त्या काळात (आषाढ शुक्ल सप्तमी ते दशमी) दूधात आंबरस मिसळून ते पेय पितात. हे पेय प्यायल्या मुळे वर्षभर सर्पदंशाचे भय उरत नाही असा तेथील लोकांचा विश्वास आहे. अंबरसयुक्त दूधाचे पान आणि सर्पदंश भयातून मुक्ती यातील संबंधाचे रहस्य शोधताना ते नमूद करतात की स्त्री रजस्वला असताना वा ती गर्भिणी असताना

१२०
भूमी आणि स्त्री