माडी बांधुनी |
श्रीमंती केली |
नथ नाही तर कशी येऊ?
नथीसाठी वंजिस गेले
सोन्याचं कारलं फेकीत आले
एक गेला जिरिया एक गेला मिरिया
एक गेला खारीका एक गेला खोबरा
खारीक खोबऱ्याचं आलं, जियामिन्याच काही नाही आलं
पड पड पापडी
चलग सई, जागरणाला
सीतेच्या माहेरी तांब्याची चूल
मखर घातलं जाई फूल
झाल झाली देवापाशी
सुनमुख झालं तुळशीपाशी
हंडा घंगाळ पाणी तापलं
बाळ न्हाऊन पाळण्यात निजलं
भुलाबाई भुलाबाई आपल्या मुलाची बाज/पाळणा पाहा
बाज/पाळणा पाहा
साखरेच्या गोणीबाई लोटविल्या अंगणी
आज आमच्या भुलाबाईला पहिला दिवस, पहिला दिवस
परहिल्या दिवसी बाळाला टोपी, मोत्यानं गुंफली,
जो जो रे जो जो रे
खेळ खेळणारा खंडोबा -
हे नमनगीत मुळातच खूप लांबलचक आहे. त्यामुळे तुकडे करून म्हटले जाते. या गीतांत मंडप घातल्याचा उल्लेख असून खंडोबा तेथे खेळ खेळत असल्याचे सांगितले आहे. 'खेळ खेळे खंडोबा' या ओळीतून काय ध्वनित होते ? मराठी भाषेत 'खेळ खंडोबा होणे' या म्हणीचा अर्थ वेगळ्या अर्थाने वापरला जातो. खंडोबा८ हे महाराष्ट्राचे लोकदैवत आहे. खंडोबाची पत्नी म्हाळसा. धनगरकन्या बाणाई हिच्या अलौकिक सौंदर्याने मोहित होऊन त्याने बाणाईशी विवाह केल्याची