Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/११९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहिले अकरा दिवस भुलाबाईच्या बाळाची बाज, टिपऱ्यांच्या साहाय्याने अभिनित केली जाते. त्यावर बाळ झोपवले जाते. अखंड सुपारीस कुंकवाचा ठिपका देऊन त्यालाच बाळ केले जाते. बाराव्या दिवशी बाळाचे नाव ठेवण्याचा विधी केला जातो. त्या दिवशी टिपऱ्यांची बाज न करता टिपऱ्यांचा चौफुला मांडून पाळणा केला जातो.

आकाश बाई आकाश अस्स कस्स आकाश
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा प्रकाश ॥

अशा रीतीने यमक जुळवून बरीच नावे घेतली जातात व शेवटी गणेश, विनायक असे गणपतीचे नाव ठेवले जाते. नाव ठेवण्याचा विधी रोजच केला जातो. भोंडला वा हादगा फेरात टाळ्यांच्या तालावर खेळतात. तर भुलाबाई मात्र टिपऱ्यांचा तालावर फेरात खेळली जाते.
 भुलाबाईचे नमन-गीत -

पहिली ग भुलाबाई
घातिली मंडपा
खंडोबाच्या नारीबाई
आवष्णीचं पाणी जसं
गंगेच्या पाण्याला
ठोकिला राळा
हनुमंत बाळाचे
सीताबाई शोभे
भाऊ भाऊ पिकती
 
झळकतीचं एकच पान
एवढीशिशी गंगा
तांब्या पितळी
तांब्या पितळी
हिरवी टोपी
हिरवी टोपी हरपली
सरपदादा एकला

देव देव सादेव
खेळखेळे खंडोबा
वसावसा आवष्णी
गंगेच पाणी
वेळीला भात
हनुमंत बाळा
लांब लांब झोके
अस्तुरी पुढे
माता पुढे झळकती
(मातापूर झयकती)
दुरून भुलाबाई नमस्कार
झुळझुळ व्हाय
झळकत जाय
नायगो
बायको
सर्पाआड लपली
जाई आंबा पिकला

११४
भूमी आणि स्त्री