Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चांद' वाटतो. तर तिची वेणी मोत्याची फणी वाटते. ही दोन्ही चित्रे सर्वसामान्य असली तरी

बहिणी तुझा खोपा गs
चंद्रफूल घेते झोपा गs

या ओळीतून नाचून खेळून दमताना सैलावलेला खोपा आणि त्यात खोचलेला आकडा ढिला होऊन सैल पडलेले सोन्याचे चंद्रफूल नाचताना वरखाली होणाऱ्या चंद्रफुलाला पाहून तेजणू डुलक्या घेतेय असे वाटणे. हे चित्र विलक्षण मोहक वाटते.
 गाणे -३: अतूला मातूला चरणी चतूला -

अतूला मातूला चरणी चतूला (हातूका मातृका चरणी चतूका)
चरणीचे सोंडे हातपाय सणसणित गोंडे (चरणीच्या सोंडेवरी खुळखुळ बाळा सोंडेवरी)
एक एक गोंडा विसाचा
नागर साडे नेसायचा
नेसा नेसा ग भावल्यांनो (मावल्यांनी)
सात घरच्या पावण्यांनो
पावण्या गेल्या खोली
चितांग टाकलं डोली
चिटक्या मिटक्या करडंफूल
ते बाई फूल मी तोडील
हादगा देवा वाहिल
हादग्या तुझा तुरारा
मोतीयाचा भरारा
बाईच्या परसांत लिंबारा
लिंबारा खाल्ला गाईनं
गाई गाई दूध ग
दूध दिलं बापाला
बाप्पा बाप्पा अंगारा

१०८
भूमी आणि स्त्री