पान:भूमी आणि स्त्री.pdf/११२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुंजक बाळाची मुंजदोरी
तीच दोरी सावध करी
सावध सावध सर्वत काळ
सर्वत काळचा उत्तम दोर....

 राळ्याचा भात किंवा राळ्याची भाकरी हे पूर्वीच्या काळी समान्यजनांचे पूर्णान्न होते. राळा हे कृषिजीवनाच्या आरंभकाळातील प्रमुख धान्य होते. राळ्याचे उल्लेख भोंडल्याच्या अनेक गाण्यांतून येतात. मानवजीवनाच्या सुरुवातीच्या काळात, ज्या वनस्पती माणसास अधिक उपयोगी असत, अशांचे उत्सव वा पूजन करण्याची प्रथा होती. भारतीय संस्कृतीत झाडापानांची पूजा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. (उदा. पिंपळाची पूजा, वटवृक्षपूजा, आवळीखाली भोजन करण्याची प्रथा, आषाढात हिरव्या झाडांची पूजा इ.)
 मुंजक बाळ : ग्रामरक्षक वीरदेवता -
 'तिरूबाई' या शब्दाचा संदर्भ शोधण्यासाठी दाक्षिणात्य भाषांचा शोध घ्यावा लागतो. तिरू म्हणजे शिव किंवा श्री...समृद्धी, तिरू हा शब्द येथे समृद्धी या अर्थाने आला असावा. 'मुंजक बाळ' म्हणजे मुंजा. मुंजा हे ब्रह्मचाऱ्याचे कडक भूत असते असे मानले जाते. 'मुंजा' हा ग्रामरक्षक तसेच क्षेत्र रक्षक असतो. कृषिविधींशी संबंधित गीतांतून मारूती, यक्ष, मुंजा या क्षेत्ररक्षक वीरांचे उल्लेख वारंवार येतात. मुंजक बाळाची दोरी म्हणजे त्याच्या जवळचे सामर्थ्य. मुंजा जानवे घालतो आणि जानव्यात संरक्षक शक्ती असते असे मानले जाते. भीती वाटली की जानव्याची गाठ हातात धरून रामनाम घेतले तर भय नाहीसे होते असा समज रूढ आहेच. दोरीमुळे मुंजकबाळाला जादू प्राप्त झाली आहे असा संकेत या ओळीतून मिळतो. तिच्यायोगाने तो सर्वकाळ क्षेत्राचे, क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या धनधान्याचे रक्षण करतो.
 एक मोहक प्रतिमा -
 या गीताचा शेवटचा भाग अलीकडच्या काळात जोडला असावा असे. त्या ओळींच्या सुसंगत रचनेवरून आणि अर्थावरून लक्षात येते. ही गीते नववयसा म्हणजेच तरुणाईच्या उंबरठ्यावर वा थोडे अल्याड असलेल्या मुली म्हणतात. त्या मुलींच्या भावजीवनांतील कोमल धागे या गीतांना सहजपणे जोडले गेले आहेत. बहिणीविषयींची अपार प्रीती त्या ओळीतून दृगोचर होते. बहिणीचा भांग 'मोतियाचा

भूमी आणि स्त्री
१०७