दोर बांधला झाडासी
झाड झबका फुल टपका
ते बाई फुल तोंडावं
बहिणीमाथा खोवावं
बहिणी तुझा भांग ग
मोतियाचा चांद ग
बहिणी तुझी वेणी ग
मोतियाची फणी ग
बहिणी तुझा खोपा ग
चंद्रफुल घेते झोपा ग
या गाण्यातील राम आणि सीतेचा संदर्भ कृषिजीवनाशी निगडित -
या गाण्याचेही विविध पर्याय सापडतात. भोंडला वा भुलाबाईच्या एकूणच गाण्यातून सीतेचा आणि रामाचा संदर्भ येतो. डोंगरात शोधूनही न सापडणारा आणि पायी चालणारा, कळ्या वेचणारा, राम या गाण्यातआहे. रामाने वेचलेल्या कळ्यांच्या फुलजाळ्या विणणारी सीता आहे. ही गीते कृषि संबंधित विधींचे अंग असलेल्या स्वरसमूहांशी, निगडित असावीत हे लक्षात घेतल्यावर त्यातील शब्दांचे संदर्भही अधिक खोलवर जाऊन पाहावे लागतात. सीता या शब्दाचा अर्थ कृषिधर्मी आदी जीवन व्यवस्थेत कोणता होता? जमीन उकरण्याच्या एका उपकरणास सीता म्हणतात. सीतेची व्याख्या कौटिल्य खालीलप्रमाणे करतो (२.३१)-सीताध्यक्षाने शेतातून राजकोठागारात आणलेले धान्य म्हणजे सीता होय. सीता ही येथे केवळ राजाच्या शेतीचीच संज्ञा नसून तिच्यातून पिकणाऱ्या धान्याची असावी. 'सीता' या शब्दाचा अर्थ राजाची खाजगी जमीन असा होतो. भारतीय इतिहासाची पाने चाळताना लक्षात येते की या संस्कृतीने अनेकविध वळणे घेतली आहेत. विविध रूपे बदललेली आहेत. दशरथ जातकातील राम आणि सीता यांच्यातील नाते रामायणातील रामसीतेच्या नात्यापेक्षा वेगळे आहे. जगातील सर्व संस्कृतींचा इतिहास पाहता असे लक्षात येते की मातृसत्ताक राज्य पद्धतीच्या उत्तर काळात सपिंड विवाह ही जागतिक स्वरूपाची घटना होती. भाऊ आणि बहीण यांचा विवाह होऊन भाऊ राज्याचा प्रमुख होत असे. आज सपिंड-विवाह कालबाह्य आणि