'मांडणे आणि खेळणे' या संकेतांतून कुमारिकांच्या किंवा नवतरुणींच्या उत्सवांपाठच्या मूळ हेतूपर्यंत आणि त्या उत्सवाच्या प्राचीन परंपरेपर्यंत जाण्यास मदत होते. या खेळसंगीताचे विध्यंगरूप पाहताना या बाबतीत अधिक सखोल विचार करता येईल.
हे कुमारिकांचे लोकोत्सव -
भोंडला, हादगा आणि भुलाबाई हे लोकोत्सव आहेत. उत्सव सामान्यतः वीरपूजा, नांगरणी-पेरणी आदी कृषिकर्मे, गणदेवता ऋतू इत्यादीसंबंधी असतात. ऋग्वेदात अशा उत्सवांना 'समन' असे म्हणत. उत्सवात नृत्यनाट्य, भोजन असे. उत्सव आमजनतेचे असत. हे साधे सरळ उत्सव कृषिकर्माशी आणि ऋतूंशी निगडित होते. ज्या उत्सवांचा आणि त्या प्रसंगी गायल्या जाणाऱ्या काही गाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला आहे, ते उत्सव मूलतः कृषिकर्माशी संबंधित आहेत. त्यात सामूहिक गीतगायन, नृत्य, प्रसाद यांना महत्त्व आहे. त्यातून आनंदाची निर्मिती होते. त्यांचे स्वरूप क्रीडेचे आहे. त्यात कर्मकांडांची कठोरता नाही.
भोंडला भुलाबाईत जातीची चौकट नसते -
हे खेळ सर्व जातिजमातीत खेळले जातात. कै. श्रीमती घळसासी, आळीतील ब्राह्मण मुलींबरोबर हादगा खेळल्या आहेत. परंतु आज भोंडल्यासाठी सर्व जातीच्या मुली येतात. या उत्सवात जातीची चौकट कठोर नसते. खानदेशात दलित समाजातील मुलीही भुलाबाई खेळायला जात असत. त्या भुलाबाई मांडत असत. असे श्रीमती ज्योत्स्ना खैरनार यांनी सांगितले. भोंडला वा भुलाबाई मांडण्याची जागा बहुधा अंगण वा ओसरीवर असते. ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. भारतीय संस्कृतिकोशात उत्सवाची व्याख्या पुढीलप्रमाणे संकलित केली आहे. २'नियताल्हादजनक व्यापार'. निश्चितपणे आल्हाद निर्माण करण्याचा उद्योग म्हणजे उत्सव.
व्रताभोवती एक चौकट असते -
३'व्रत' म्हणजे विशिष्ट काळासाठी वा आमरण केला जाणारा विशिष्ट नेमधर्म, व्रत कल्पना ऋग्वेदात आढळते. व्रत हा शब्द 'वृ' म्हणजे निवडणे या धातूपासून तयार झाला. अमरकोशात व्रत आणि नियम हे शब्द समानार्थी धरले आहेत. 'मिताक्षरा' नुसार व्रत म्हणजे काही करण्याचा व काही न करण्याचा निश्चय.
पान:भूमी आणि स्त्री.pdf/१०१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९६
भूमी आणि स्त्री