पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५

वीररस.

 युद्ध, दान, दया, पांडित्य, क्षमा, इत्यादि कोणतेंही सत्कृत्य करण्याविषयीं मनुष्याच्या मनांत जो उत्साह उत्पन्न होतो, तो वर सांगितलेल्या रीतीनें त्यांच्या कारण, कार्य, व सहकारी यांनीं पूर्णत्वास पावला असतां वीररस होतो.

 ह्यांत उत्साह हा स्थायीभाव. युद्धोत्साह, बलाढ्य शत्रूंशीं सामना, स्वपक्षाची भरभराटी, दैवी सहाय, मित्रबल, विजयाचा संभव, देशकालादि अनुकूल स्थिति, पुण्यतिथि, दानोत्साह, दान घेण्यास योग्य अतिथि इत्यादि विभाव. हा उत्पन्न झाला ह्मणजे बाहू स्फुरण पावतात, मुखावर तेज झळकूं लागतें, सैन्याची तयारी केली जाते, शत्रूची निर्भत्सना दृष्टीस पडते, वस्तुसमर्पण, पूजन, योग्य सत्कार इत्यादि अनुभाव व आवेश, अमर्ष, धृति, गर्वे, उग्रता, इत्यादि व्यभिचारी भाव होत.

 उदाहरण-"छत्रसालाचें हें पत्र पाहतांच, बाजीराव स्नानास बसला होता, तो स्नान न करितां, मित्राच्या शत्रूचा पराभव करून, नंतरच मंगलस्नान करूं, असें ह्मणून त्यानें लागलीच फौजेच्या तयारीचा हुकूम दिला. त्याचे बाहू स्फुरण करूं लागले, युद्धाचा प्रसंग येईल ह्मणून त्यास आनंद झाला व कधीं तेथें जाऊन पोहचूं व कधीं छत्रसालाच्या शत्रूस आपलें शौर्य दाखऊं असें त्यास झालें. त्या योगानें लांबलांबचे मुकाम करून, एकदाचा तो