पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३

 संभोगांत सांगितलेले सामान्य विभाव असून शिवाय गुणस्मरण, पूर्वीं उपभोग घेतलेल्या पदार्थाचें पुनः दर्शन, भेटींत येणाऱ्या अडचणी हे विभाव. ह्या व इतर कारणांनीं वियोग प्रदीप्त होऊन वैवर्ण्य, चैन पडेनासें होणें, रोदन करणें, चंद्रादि शीतल पदार्थ तापद वाटणें, प्राप्तीविषयीं कल्पना करणें, मोह पडणें इत्यादि अनुभाव व ह्यामुळे चिंता, स्वप्न, विषाद, जडता, अमर्ष, असूया, इत्यादि जे विकार ते व्यभिचारीभाव होत.

 उदाहरण-"हे प्राणप्रिया, ही चंद्रिका, हा मलयानिल, हा शरत्काल, हे सर्व तुमच्यावांचून मला तापप्रद होतात. प्रिया, आतां माझा अंत पाहूं नका. मी तुमच्या पायां पडतें, पदर पसरतें, माझे सर्व अपराध क्षमा करा, व लवकर येऊन मला प्रेमालिंगन द्या. आतां हा विरहताप माझ्यानें सहन करवत नाहीं. देवा, आज मला प्रियदर्शन घडेल काय? छे, छे, अशी मी भाग्यवान् कोठं आहें! पण शोक करून काय होणार! क्षणभर प्रियगुणांचें गान तरी करूं. त्यांतच निद्रा लागली तर स्वमांत तरी प्रियाचें दर्शन घडेल."

 ह्यांत प्रधान मनोवृत्ति (स्थायीभाव) प्रेम ही असून


 १ विप्रलंभाचें रोदन हें करुणरस होत नाहीं; कारण करुणरसाचा स्थायीभाव शोक आहे, आणि विप्रलंभशृंगाराचा स्थायीभाव रति आहे. जोंपर्यंत इष्टजनांच्या प्राप्तीची आशा आहे तोंपर्यंतचा शोक विप्रलंभशृंगार समजला जातो आणि जेथें आशा मुळींच नसते तो शोक करुणरस समजला जातो.