पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रस्तावना.

कोणतीही भाषा शुद्ध रीतीनें बोलण्यास किंवा लिहिण्यास ज्याप्रमाणें त्या भाषेच्या व्याकरणशास्त्राच्या ज्ञानाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणें त्या भाषेस अर्थचमत्कृतीनें सौंदर्यशास्त्राचें ज्ञान असणें इष्ट आहे. सोन्याच्या खाणींतील माती, त्या मातीपासून काढलेलें शुद्ध सोनें आणि त्या सोन्याचे उत्तम कारागिरानें तयार केलेले अनेक प्रकारचे दागिने ह्या तीन वस्तूंचा परस्पर जसा संबंध आहे, तसाच भाषेचाही आहे. भाषेचें असंस्कृत मूळ स्वरूप सोन्याच्या खाणींतील मातीप्रमाणें आहे; व्याकरणसंस्कारानें ती शुद्ध सोन्याप्रमाणें होते आणि सौंदर्यशास्त्रानुरोधानें बनविलेलीं तिचीं पदें हीं दागिन्याप्रमाणें होत. सोन्याच्या मातीची जी किंमत येते त्यापेक्षां शुद्ध सोन्याची अधिक येईल व दागिन्याची त्याहीपेक्षां अधिक येईल हें उघड आहे. भाषेचा मुख्य उद्देश आपल्या मनांतील विचार दुस-यास कळवितां यावे हा होय. तो कशीही भाषा बोललें तरी सिद्धीस जातो. पण विद्वान् लोकांस तसें भाषण किंवा लेखन आवडत नाहीं ह्मणून ते तिला व्याकरणाचा संस्कार देतात, त्या योगानें तिच्या अंगीं शुद्धता येते; पण आपल्या भाषणानें किंवा लेखनानें दुस-याचें चित्त आकर्षण होईल अशी मोहकता, रमणीय शब्दरचना, अर्थगौरव व आपले विचार दुस-याच्या मनांत उत्तम प्रकारें ठसवून देणें इत्यादि गुण भाषेंत आणावयाचे असले तर ते फक्त व्याकरणानें आणतां