पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०

 २८ मति-विचारशक्ति-यथार्थज्ञान होणें ती.

 २९ व्याधि-ज्वरादिक-ज्वरादिकानें जाहलेला जो विकार ती.

 ३० उन्माद-अविचारानें घडलेला आचार तो.

 ३१ मरण-प्राणाचें निष्क्रमण तें.

 ३२ त्रास-मनाचा विक्षोभ तो.

 ३३ वितर्क-संशयाचे साधकबाधकाचा जो विचार तो.

 ह्या सर्व तेहतीस मनोवृत्ति प्रधानमनोवृत्तीस (स्थायीभावास) पुष्ट करण्याच्या कामीं साह्य करितात, व कधीं कधीं, ह्याही प्रधान होतात. तरी त्यांस रस ही संज्ञा प्रास होत नाहीं.

 कवितेंत जितकें रसाला प्राधान्य असतें, तितर्क अन्यत्र नसतें; तथापि उत्तम वक्त्याच्या भाषणांत, गद्यात्मक नाटकांत, कादंबऱ्यांत, व कधीं कधीं निबंधादिकांतही रसाविर्भाव दृष्टीस पडतो; ह्मणूनच हा विषय येथें घेतला आहे. आतां प्रत्येक रसाचीं लक्षणें व उदाहरणें निरनिराळीं सांगतों.


श्रृंगार.

 तरुण स्त्रीपुरुषांचे प्रीतीचा उत्कर्षे तो शृंगार होय. हा रस, रुंभोग शृंगार आणि विप्रलंभ शृंगार असा दोन प्रकारचा आहे.

संभोग श्रृंगार.

 तरुण स्त्रीपुरुषांच्या समागमाचें जें वर्णन असतें, तो संभोग श्रृंगार होय.