पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९

 दैन्य-दुःखाचे अतिरिक्ततेनें झालेली जी दीनता तें.

 चिंता-एखादे वस्तूचे प्राप्तीविषयीं ध्यान लागणें ती.

 १० मोह-वैचित्य, ह्मणजे प्रीतियुक्त पदार्थ पाहून जाहलेला कर्तव्यफुटपणा तो.

 ११ स्मृति-संस्कार पूर्वी जालेल्याचें स्मरण ती.

 १२ धृति-धैर्य-संतोष (दु:खांतही अदुःखबुद्धी).

 १३ त्रीडा-लज्जा-स्वच्छंदक्रियेचा जो संकोच ती.

 १४ चपलत–इतरेतर क्रियेची शीघ्रता ती.

 १५ हर्ष– चित्ताचे ठिकाणी प्रसुन्नता तो.

 १६ अावेग-अकस्मात इष्टानिष्टाचा निःपातविवर्त तो.

 १७ जडता-सर्व व्यवहारांत अक्षमत्व होणें ती.

 १८ गर्व-स्वात्म्याचे ठिकाणीं सर्वांपेक्षां अधिकत्वबुद्धी.

 १९ विषाद-इष्ट संशय आणि अनिष्ट जिज्ञासा तो.

 २० औत्सुक्ष्य-सकल इंद्रियांनीं एकेवेळेस क्रियेचा आरंभ होणें तो.

 २१ निद्रा-इतर इंद्रियांपासून निवृत्त होऊन त्वचेचे ठिकाणीं लीन होतें जें मन ती.

 २२ अपस्मार-ग्रहादिकांचे जे आवेश तो.

 २३ सुप्ति-त्वचेतेंही दाकून मन राहतें ती.

 २४ प्रबोध-इंद्रियांचा जो प्रथम प्रकाश तो.

 २५ अमर्प-रोष-पराहंकारप्रशमन तो.

 २६ अवहित्थ-आकारव्यवहारसंगोपन तो.

 २७ उग्रता-निर्दयता.