पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५

 ह्या स्थायीभावाच्या लक्षणेंत, चार गोष्टी प्रसिद्ध आहेत. १ वासनेपासून उत्पन्न होऊन चिरकाल चित्तांत राहणें, २ अन्य विकारांपासून नाश न पावणें, ३ अन्य विकारांस आपल्या तल्लीन करणें, व ४ कार्यकारणांनीं (विभावादिकांनीं) फैलावून रसरूप बनणें.

विभाव.

 स्थायीभाव (प्रधानमनोवृत्ति ) उत्पन्न होण्याची जी कारणें त्यास विभाव ह्मणतात; हे दोन प्रकारचे आहेत.

 आलंबनविभाव. २ उद्दीपनविभाव.

 आलंबनविभाव-ज्यांच्या आश्रयानें मनोवृत्ति उत्पन्न होते ते आलंबनविभाव होत. जसे-शृंगारांत स्त्री किंवा पुरुष. इतर रसांत, ज्यांच्याविषयीं उत्साहादि वृति उत्पन्न होतात, ते ते पदार्थ.

 उद्दीपनविभाव-उत्पन्न झालेल्या मनोवृत्तीस जागृत करणारे देश, काल, आलंबन विभावांचें रूप, गुण, अलंकार इत्यादि पदार्थ हे उद्दीपनविभाव होत. जसे शृंगारांत उपवन, एकांतस्थल, वसंतादि ऋतु, चंद्रोदय, रात्रि, स्त्रीचें रूप, गुण, अलंकार इत्यादि.

 उद्दीपनविभाव चार प्रकारचे आहेत. ते असे:--


 १ विशेषेण भारयत्युत्पादयति ये रसांस्ते विभावा: ।

 २ यमालव्य रस उत्पद्यते स आलंबनः ।

 3 यो रसमुद्दीपयति स उद्दीपनविभावः ।