पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०

 "प्रथमतः पूर्वदिशेकडे अभ्रावर आरक्तवर्णाची किंचित् छाया दिसूं लागली, नंतर अभ्राचा वर्ण सुवर्णासारखा पिवळा झाला, नंतर त्यांत हळू हळू पांढरेपणा येऊं लागला, आणि त्यानंतर अंधकाराचा नाश करणारा चंद्रमा उदय पावला." ह्यांत चंद्रोद्याचें क्रमानें वर्णन केलें आहे.

 ४ सुधर्मिता-जेथें विशेष्याचा स्पष्ट उल्लेख न करितां, त्याच्या विशेषणांनींच तें सुचविलें असतें तेथें हा गुण होतो. जसें--

 "ज्यांनीं आपल्या लेखणीला अवरोध होऊं लागला म्हणून राजसेवेचा त्याग करून स्वतंत्र मासिक पुस्तक काढलें, ज्यांनीं सत्यमतप्रकाशनांत आपल्या जनकाचीही भीड ठेविली नाहीं, ज्यांनीं अल्पकाळच पण पूर्वी कधींही कोणी न केलेली अशी स्वभाषेची अनन्यभावें सेवा करून आपलें नांव अमर करून ठेविलें, त्या पुण्यपुरुषाची जितकी स्तुति करावी, तितकी थोडीच आहे."

 हें वाक्य कैलासवासी विष्णु शास्त्री चिपळूणकर ह्यांस उद्देशून लिहिलें आहे. ह्यांत त्यांच्या नांवाचा उल्लेख न करितां प्रसिद्ध विशेषणांनींच त्यांचें नांव सुचविलें आहे.

 हे गुण भाषणांत, लेखांत, प्रसंग पाहून जेथें उचित दिसतील तेथें साधावे.


रस.

 मनुष्याच्या मनांत हर्षशोकादिक मनोवृति उत्पन्न झाल्या असतां, त्यांची जी अवस्था होते, तिचें यथायोग्य