पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८

येळस, माज्या आंगाचा तिळपापड जालाय. ह्ये बोलन आपनासनीच सोबो. (माधवरावास.) सायब जोहार करतो. या चाकरमान्याला आग्न्या व्हय. त्यो मुसलमान माज्या डोळ्यामंधी पूरीपासून सलतोय. ह्यो परानी जीवत हाय त्यो परत त्येचा सूड उगवील."

------------
अर्थाचे गुण.

 जसे मागें सांगितलेले अर्थाचे पांच दोष टाकले पाहिजेत तसे अर्थाचे चार गुण आहेत, ते साधण्याविषयीं यत्न केला पाहिजे. ते गुण हे:-

 १ भाविकत्व, २ सुशब्दत्व, ३ पर्यायोक्ति, आणि ४ सुधर्मिता. त्यांचीं लक्षणें व उदाहरणें.

 १ भाविकत्व-ज्या भाषणांत कांहीं तरी गूढ अभिप्राय ठेविला असतो असें भाषण, अर्थात् व्यंग्यार्थयुक्त भाषण. ह्याचीं उदाहरणें व्यंग्यार्थीत आलींच आहेत, तथापि आणखी. जसें--

 "आमच्या देवाला संगीतयुक्त प्रार्थनेची गरज लागत नाहीं. किंवा मोहनभोगाच्या आहुतींच्या यज्ञाची अपेक्षा नाहीं. तर नुस्त्या भक्तियुक्त मनानें ह्मटलेल्या एखाद्या अभंगानें सुद्धां तो धांवत येतो."

 ह्यांत प्रार्थनासमाज व आर्यसमाज ह्यांची निंदा व तुकारामाच्या भक्तिभावाची प्रशंसा करण्याचा वक्त्याचा गूढ अभिप्राय आहे.