पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७

 ३ पुनरुक्त-एकदां सांगितलेली गोष्ट पुनः सांगितली असतां हा दोष होती. जसें--

 "जरी काबुलच्या अमीराशीं रशियांनीं संधान लाविलें, तरी त्यांत सरकारास भीति बाळगण्याचें कारण नाहीं. जोंवर आमच्या देशी राजांजवळ बरेंच सैन्य आहे, तोंवर शंभर रशिया आले, तरी त्याविषयीं काळजी करणें नलगे."

 ह्मांत "भीतीचें कारण नाहीं" असें एकदां सांगून नंतर तीच गोष्ट "काळजी करणें नलगे" असें ह्मणून पुनः सांगितली आहे.

 ४ दुष्क्रम-योग्यतेच्या मानानें जो अर्थ ज्या क्रमानें सांगितला पाहिजे, तो त्या क्रमानें न सांगितला तर हा दोष होती. जसें--

 "देशी संस्थानिक, सिव्हिलियन, पोलिटिकल एजंट, गव्हरनर, रेसिडंट हे सर्व सारख्याच योग्यतेचे आहेत, असें सरकार समजतात काय?"

 ह्या वाक्यांत योग्यतेच्या मानानें, देशी संस्थानिक, गव्हरनर, रेसिडंट, पोलिटिकल एजंट, आणि सिव्हिलियन असा क्रम पाहिजे होता.

 ५ ग्राम्य-केवळ हलक्या लोकांच्याच भाषेंत जो अर्थ येतो, असा अर्थ योजिला असतां, हा दोष होती. जसें-- प. मा. पे. ना.

 "काय दादासाब खडनी! अन् त्या हैदराला! या