पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६

 १ अपुष्टार्थ-ज्याच्या योगानें प्रतिपाद्य अर्थास कांहीं पुष्टि येत नाहीं, अशा अर्थाचें वर्णन आलें असतां. हा दोष होती. जसें--

 "ज्याला दुष्कृत्याचा कधीं संपर्कच नाहीं, अशा त्या सज्जनशिरोरत्न माधवदासाविरही लोकांनीं चोरीचा अारोप आणिला."

 ह्या वाक्यांत माधवदासास सजनशिरोरत्न असें विशेषण दिल्यावर मग 'ज्याला दुष्कृत्याचा कधीं संपर्कच नाहीं', असें विशेष विधान केल्यानें प्रतिपाद्य अर्थास कांहीं पुष्टी आली नाहीं.

 २ व्याहत-प्रथम जी गोष्ट सांगितली तिच्याच विरुद्ध पुढें दुसरी गोष्ट सांगितली असतां हा दोष होतो. जसें--

 "आह्माला तर बुवा, तुमच्या राष्ट्रीय सभेनें व धर्ममंडळानें कांहीं लाभ दिसत नाहीं. सरकार हुकूम करतील तो मुकाट्यानें ऐकणें, आणि पितृपरंपरागत चालीप्रमाणें वागणें, हीच आमची राष्ट्रीय सभा व हेंच आमचें धर्ममंडळ होय."

 ह्यांत राष्ट्रीय सभा व धर्ममंडळ यांपासून कांहीं लाभ नसल्याचें पूर्वी सांगितलें असतां, पुढे राजाज्ञा आणि क्रमागत आचाराचा खीकार, ह्यांवर पुनः अनुक्रमें राष्ट्रीय सभा आणि धर्ममंडळ ह्यांचा आरोप केला आहे, हें पूर्वीच्या अर्थाविरुद्ध आहे.