पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४

अयोध्येंत जातांच ती अयोद्याधीश भगवान् श्रीरामचंद्राचें नामस्मरण करूं लागली." असा व्यंग्यार्थ प्रतीत होतो.

 २. अर्थाश्रित-जेथें वक्ता, श्रोता, काल, देश, प्रकरण, इत्यादि कारणांच्या योगानेंच वाक्यांतून किंवा वाक्यसमूहांतून, व्यंग्यार्थ उत्पन्न होती, तो अर्थाश्रितव्यंग्यार्थ होय. कारण, ह्यांत वाक्यांतील शब्द बदलून त्या अर्थांचे दुसरे शब्द घातले तरी व्यंग्यार्थाची हानि होत नाहीं. जसें--

 आरोपीस बारमध्यें आणिलें तेव्हां त्यानें जज्जास कांहीं नेत्रसंकेतद्वारें विनंति केली; जज्जानें त्याची जबानी मुकाट्यानेंच घेतली; व दोन वाजतां जज्ज चाहा पिण्यास उठले, तेव्हां आरोपीशीं एकांतांत कांहीं भाषण केलें. त्या वेळेस आरोपीच्या वकीलानें एक बूक जज्जास दिलें, तें त्यांनीं उघडून पाहून कोटाच्या खिशांत घातलें; व चाहा पिऊन येतांच विशेष कांहीं गडबड न करितां, जज्जानें आरोपीस दोषमुक्त करून सीडून दिलें.”

 ह्यांत एकानें एकास घडलेली गोष्ट सांगितली आहे असें मानिलें, तर ह्मांत व्यंग्यार्थ मुळींच कांहीं नाहीं. परंतु हीच गोष्ट, फिर्यादी, जज्जाच्या वरिष्ठास कळवितो आहे असें मानिलें तर जज्जास आरोपीनें बुकाच्या पोटांत घालून लांचेच्या नोटा दिल्या असा व्यंग्यार्थ प्रतीत होती. किंवा जसें--