पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२

 हा शब्दाच्या एखाद्या अवयवांत, नामें, सर्वनामें, विशेषणें इत्यादि शब्दांच्या सर्व जातींत, वाक्यांत, प्रकरणांत, सर्व ठिकाणीं असती. जसें--

 १. "त्याची प्रशांत वृत्ति पाहून मला फार आनंद झाला." ह्या वाक्यांत शांत शब्दामागें 'प्र' उपसर्ग लाविल्यानें 'अत्यंत शांत' असा व्यंग्यार्थ प्रतीत झाला.

 २. "ही स्तुति ऐकतांच शंकरानें मार्कंडेयाचें कल्याण केलें." ह्या वाक्यांत 'शंकर' ह्या नामास 'कल्याण करण्याचें सामर्थ्य ठेविणारा' असा व्यंग्यार्थ प्रतीत होतो. हा, येथें महादेव हें नाम असतें तर न होता.

 ३. "तें सुख आतां विसरलेंच पाहिजे.” ह्मांत 'तें' ह्या सर्वनामांत 'पूर्वकाळीं अनुभवलेलें' असा व्यंग्यार्थ प्रतीत होतो.

 ४. "ब्राडला साहेबाचे भोजनाचा बंदोबस्त एखाद्या सभ्य ब्रह्मोगृहस्थाकडे सांगा. ब्राह्मणास सांगू नका."

 ह्यांत गृहस्थास 'ब्रह्मो' हें विशेषण दिल्यानें 'ब्रह्मधर्मात, जातिभेद व सोवळें ओवळें नसल्यानें त्याजबरोबर भोजनास बसून तो त्याचा सत्कार चांगला करील.' असा व्यंग्यार्थ प्रतीत होतो.

 ह्याप्रमाणें आणखी उदाहरणें अन्यत्र पाहून घ्यावीं.

 व्यंग्यार्थ शब्दाश्रित आणि अर्थाश्रित असा दोन प्रकारचा असतो.

 १. शब्दाश्रित-ज्या ठिकाणी (वाक्यांत किंवा