पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८

 निबंधमालेंत एके जागीं म्हटलें आहे कीं, "जर पवित्र शास्त्रांतही देवाविषयींच्या समजुती वर सांगितल्याप्रमाणें दृष्टीस पडतात, तर आमच्या अपवित्र नेटिव शास्त्रांतून व नेटिव काळ्यांतून, त्या तशाच आढळल्यास नवल कसचें !" ह्यांतही 'पवित्र' व 'अपवित्र' शब्द तद्विरुद्ध अर्थाचे लक्षक आहेत. अलंकारिकांनीं ह्याच अर्थावरून निंदेनें स्तुति व स्तुतीनें निंदा सुचविणारा व्याजस्तुति नांवाचा अलंकार साधला आहे. जसें--

 १. "हिंदुस्थानांत यत्किंचितही कोणास दुःख होऊं नये अशा उदार व दयार्द्र बुद्धीच्या मॅन्चेस्टरच्या व्यापारी लोकांस, हिंदुस्थानांतील गिरण्यांत मजूर लोकांस अधिक वेळ काम करावें लागतें इतकें देखील त्या गरीबांचें दुःख सहन न झाल्यानें, त्यांनीं सरकारास अर्ज करून कायदा करून घेतला. केवढी ही भूतदया!”

 २. "ऐन कंपनीच्या आमदानींत सुद्धां मिल्ल साहेब म्हणतात कीं, हिंदुस्थानच्या उत्पन्नांतून इंग्लंडास कांहीं पेंसा नेतां येता ह्मणजे इंग्लंडला त्यापासून कांहीं फायदा आहे असें ह्मणतां आलें असतें; पण हिंदुस्थान ह्मणजे एक जबरदस्त लोढणें व इंग्लंडचें सत्व हरण करणारी तुंबडीच आहे! तेव्हां अशा गैरफायद्याचा व त्रासदायक राज्यकारभार इंग्लंड हाकीत आहे, हे त्याचे मोठे दांडगे उपकार आहेत. आमच्या कल्याणार्थ इंग्लंड रात्रंदिवस आणि तनमनधनेंकरून झटतें हें सिद्ध झालें; व झटणें