पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रित्रादि अंगाशींही जलादिक सरोवराच्या अंगाचा अभेद केला आहे.

 ह्याचप्रमाणें दुसरे उदाहरणाचा प्रकार आहे.

 २. शुद्ध-ह्मणजे सादृश्यावांचून इतर संबंधावरून झालेला लक्ष्यार्थ, तो शुद्ध लक्ष्यार्थ होय. ह्याचेही वर सांगितल्याप्रमाणें सारोप आणि साध्यवसान, असे दोन भेद आहेत. त्यांचीं उदाहरणें.

शुद्ध सारोपाचें.

 "विद्याधन हैं सर्वे धनांत श्रेष्ठ आहे." या वाक्यांत ‘विद्या' हैं धनार्च कारण असून, ‘धन' हैं त्याचें कार्य आहे. अशा कार्यकारणसंबंधानें विद्येवर धनाचा आरोप केला असून विद्येची प्रशंसा करणें हें येथें निमित्त आहे. व ‘विद्या आणि धन' ह्या दोन्ही शब्दांचा उल्लेख असल्यामुळे हा शुद्धसारोपलक्ष्यार्थ होय.

शुद्ध साध्यवसानाचें.

 'लॉटसाहेब हे या देशांत सातवे एडवर्ड बादशहाच आहेत.' यांत सेव्यसेवकभावसंबंध आहे.

 ३. विरुद्ध-वाच्यार्थीच्या विरुद्ध अर्थाची जेथें प्रतीति होते, तो विरुद्धलक्ष्यार्थ होय. जसें-कोणी कोणा एकाच्या मूर्खत्वास उद्देशून ह्मणतो, "तुह्मी तर मोठे शहाणेच आहात.” ह्यांत शहाणे शब्दाचा लक्ष्यार्थ तद्विरुद्ध मूर्ख असा असून श्रोत्याची निंदा करणें हें निमित्त आहे.

  भा० ४