४. "यशवंतराव होळकराच्या फौजेंतील शिपाई कसलेले वीर होते."
यांत 'कसलेले’ शब्दाचा वाच्यार्थ सुटून, त्याचा अनुभवलेले असा अर्थ होती.
३. विरुद्ध-जेथें वाच्यार्थाच्या विरुद्ध अर्थाचा बोध होतो तो विरुद्ध लक्ष्यार्थ होय. जसें--
(१) "रामाच्या वामांगीं सीता आणि सव्यभागीं लक्ष्मण उभा होता."
येथें 'सव्य' शब्दाचा वाच्यार्थ वामभाग असा असतां, रूढीनें तो शब्द दक्षिण भागाचा बोधक झाला आहे.
(२) "मी कोणाच्या अपरोक्ष कोणाची वाईट गोष्ट सांगणार नाहीं."
ह्या वाक्यांत 'अपरोक्ष' शब्दाचा वाच्यार्थ 'प्रत्यक्ष' असा असतां, रूढीनें त्याचा अर्थ अप्रत्यक्ष असा झाला आहे.
४. लक्षित–जेथें पदांतील अवयवांवरूनच एखाद्या पदार्थीचा बोध होतो, तो लक्षित लक्ष्यार्थ होय. जसें--
'द्विरेफ' या शब्दाचा वाच्यार्थ, ज्यांत दोन रेफ ह्मणजे रकार आहेत तो असा असून, तसे शब्द, 'रबर,’ ‘रकार, ‘करार,' 'रुकार,' इत्यादि अनेक असतांही, त्यांचा तो बोध न करवितां, 'भ्रमर' ह्याच शब्दाचा बोध करवितो. याचप्रमाणे पंकज, पयोद इत्यादि शब्द जाणावे.
भाषेमध्यें शब्दांपुढें त्यांचे पर्याय शब्द जोडून लिहिण्याचा विशेषतः बोलण्याचा परिपाठ आहे. हे दोन्ही शब्द प्राय: