पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९

 ह्यांत 'कावळा' शब्दानें, दह्याचा नाश करणारे इतर मांजर, कुत्रा इत्यादिक प्राण्यांचाही बोध होतो.

 ४. "आमचा देश, आमचें राज्य, आमची विद्या, आमचें शौर्य, हें सर्व सांप्रत लुप्त झालें आहे."

 ह्यांत आमचा, आमचें, आमची, ह्या शब्दांनीं अनुक्रमें, स्वदेश, स्वजातीयांचें राज्य, व वडिलोपार्जित देशी विद्या, हे अर्थ लक्षित होतात.

 ह्या सर्व उदाहरणांत वाच्यार्थ कायम राहून अधिक अर्थाचा संग्रह होती, हें लक्ष्यांत येईल.

जहत्वार्थाचीं.

 १. "या समयीं भारतभूमीनें कितीही आक्रोश केला, तरी विजयी इंग्लंडास तिची दया येणार नाहीं."

 या वाक्यांत 'भारतभूमि' आणि 'इंग्लंड' ह्या शब्दाचे वाच्यार्थ जे देशविशेष, ते, अगदीं सुटून तद्देशवासी पुरुषांचा बोध होतो.

 २. "ह्या कृत्यानें, नानाफडणविसानें, इंग्रजासारख्या शाहण्या मुत्सद्यासही लाजविलें."

 ह्मा वाक्यांत 'लाजविलें' शब्दाचा वाच्यार्थ अगदीं सुटून, त्या शब्दानें इंग्रजांच्या बुद्धिहीनतेचा बोध होतो.

 ३. "या भाषणानें तूं आपली वाणी मात्र विटाळली."

 या वाक्यांत 'विटाळली' शब्दाचा वाच्यार्थ सुटून भाषणाचें अनौचित्य सूचित होतें.