पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५

 १. "ही स्त्री सांप्रत विपत्तीनें गाय झाली आहे."

 २. "माझें घर गंगेवरच आहे."

 हीं वाक्यें निमित्तानें झालेल्या लक्ष्यार्थाचीं आहेत, कारण त्यांतील एकांत वर्णनीय स्त्रीची दैन्यावस्था दाखविणें व दुसऱ्यांत घराची पवित्रता व शीतलता दाखविणें हीं निमित्तें आहेत.

 लक्ष्यार्थीचे आणखी भेद व पोटभेद निरनिराळ्या ग्रंथकारांनीं निरनिराळ्या प्रकारांनीं अनेक केले आहेत. काव्यप्रकाशकार, लक्ष्यार्थीचे शुद्धगौण असे दोन मुख्य भेद मानून शुद्धांत उपादानलक्षण असे दोन पोटभेद मानतात; आणि ह्या भेदांत प्रत्येकाच्या पोटीं सारोप आणि साध्यवसान असे आणखी दोन दोन पोटभेद मानून एकंदर लक्ष्यार्थाचे सहा भेद करितात. त्यांच्या मतें, हे सहाही भेद निमित्तानें होणाऱ्या लक्ष्यार्थाचेच होतात. साहित्यदर्पणकार, रूढीनें होणाऱ्या लक्ष्यार्थीतही; सारोपसाध्यवसान हे दोन भेद अधिक मानून लक्ष्यार्थीचे मुख्य आठ भेद करितात. साहित्यसारकर्ते, रूढीनें आणि निमित्तानें होणाऱ्या लक्ष्यार्थीच्या पोटीं १ गौण, २ शुद्ध, ३ विरुद्ध, आणि ४ लक्षित, असे चार चार भेद मानून निमित्तावरून होणाऱ्या लक्ष्यार्थीतील १ गौण व २ शुद्ध' ह्या भेदांत सारोपसध्यवसान असे आणखी दोन पोटभेद अधिक मानतात. ते मिळून एकंदर लक्ष्यार्थीचे बारा भेद करितात. ह्याशिवाय चंद्रा-

  भा० ३