पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

 २ "सन १८५७ साल हिंदुस्थानच्या इतिहासांत फार महत्वाचें समजलें जातें. ह्याचें कारण त्या वर्षों अशा कांहीं चमत्कारिक गोष्टी घडून आल्या कीं त्या योगाने हिंदु लोकांची तेजस्विता सर्व जगास विश्रुत झाली. आतां त्या गोष्टी राजनिष्ठच्या दृष्टीनें सर्वे प्रकारें अनिष्ट होत्या हें जरी खरें आहे, तरी त्यापासून कालाचा विचित्र महिमा अत्यंत ग्रस्त झालेल्या जात्या निरुपद्रवी मानव स्वभावाचें क्षणांत दृग्गोचर होणारें भयंकर रुद्रस्वरूप, अति लोभामुळें प्राप्त होणारी विपन्नावस्था व 'लोभमूलानि पापानि' या सद्वचनाचा सत्यानुभव आणि सुविचारजनित दयाशीलता इत्यादि अनेक बोधपर व राज्यधुरंधरासही मनन योग्य अशीं सुंदर तत्वें व्यक्त झालीं ह्यांत संशय नाहीं. इत्यादि.

 या वरील उदाहरणांत पूर्वी सांगितलेल्या वाचक व वाच्यार्थीच्या भेदाचे शब्द वाचकांनीं ओळखून काढावे.

लक्ष्यार्थ.

 जेव्हां भाषेतील रूढीमुळे, किंवा एखादा गूढ अर्थ सुचविण्याकरितां, शब्दांची अशी योजना केली असते की त्या ठिकाणी त्या शब्दाचा वास्तविक अर्थ ह्मणजे वाच्यार्थ घ्यावा तर तात्पर्यार्थाला बाध येतो, ह्मणून तेथें त्या शब्दाच्या तात्पर्यार्थास जुळेल असा दुसरा अर्थ झाल्यावा लागतो, त्या दुसऱ्या कल्पित अर्थास लक्ष्यार्थ किंवा गौणार्थ असें ह्मणतात. जसें--