पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९

 ह्या दोन्ही प्रकारच्या वर्गाचा ह्या शास्त्रांत फार उपयोग आहे.

 वाच्यार्थ शब्दगत, वाक्यागत आणि प्रकरणागत किंवा प्रबंधगत असा असतो.

 १ शब्दगत वाच्यार्थाचीं उदाहरणें वर दिलींच आहेत.

 २ वाक्यगत असतो तो असा. -- "रामा गांवीं गेला." "गोविंदा घरीं आहे." "सरकारची आपल्यावर दया आहे." इत्यादि.

 ह्या वाक्यापासून जो अर्थबोध होतो तो त्यांचा वाच्यार्थ आहे.

 ३ प्रकरणागत - (प्रबंधगत) ह्यांत वाक्यसमूहरूप एखादें कलम, गोष्ट, किंवा सर्व ग्रंथ ह्यांचा समावेश करावा. ज्या वाक्यसमूहांत योजिलेल्या सर्व शब्दांचा जेव्हां वक्तयास, किंवा लिहिणारांस केवळ वाच्यार्थच अभीष्ट असेल तेव्हां तो प्रकरणागत किंवा प्रबंधगत समजावा. जसें--

 १ "ह्या जगांत ज्यांस भलें ह्मणून घेण्याची इच्छा आहे त्यांनीं सर्वांशीं नम्रतेर्ने वागावें हें त्यांस सर्वोत्तम साधन आहे. जे लोक ह्या साधनाचें अवलंबन करीत नाहींत ते खरोखर कितीही चांगले असले तरी कोणाचा उत्कर्षे सहन न करणाऱ्या लोकांकडून एखाद्या प्रसंगीं त्यांस त्रास झाल्यावांचून राहणार नाहीं."