पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६

 शब्दाचा मुख्य अर्थ असल्यामुळे ह्यास मुख्यार्थही ह्मणतात. जसें--गाय, घोडा, गाडी, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादि.
 हे शब्द ज्या ज्या अर्थाचे वाचक आहेत ह्मणजे ह्या शब्दांपासून ज्या ज्या अर्थाचें ज्ञान व्हावें असें ठरलेलें आहे तो तो अर्थ त्या त्या शब्दाचा वाच्यार्थ होय. जसें--
 "ही गाय पुष्ट आहे.” व “ पुत्र गेल्यानें ही स्त्री गाय झाली.” "हा सोळा वर्षांचा घोडा आहे.” व “ हा बाळ्या सोळा वर्षांचा घोडा झाला तरी ह्यास कांहीं कळत नाहीं."
 ह्यांतील पहिल्या वाक्यांत 'गाय' शब्द एका पशूचा वाचक असल्याप्रमाणें तो पशूचाच बोध करवितो. ह्मणून 'पशु' हा त्याचा वाच्यार्थ आहे. परंतु दुस-या वाक्यांत आलेल्या गाय शब्दाचा पशु हा अर्थ होत नाहीं. कारण तो मनुष्यास लाविला आहे. तेथें 'गाय' शब्दाचा 'गायीप्रमाणें दीन' असा अर्थ होतो; तेव्हां तो कांहीं वाच्यार्थ नव्हे, हें उघड आहे. हाच प्रकार पुढील दोन उदाहरणांतही समजावा.
 वाच्यार्थ हा त्या भाषेच्या अभ्यासानें किंवा व्याकरण शिकल्यानें कळतो, परंतु संस्कृत ग्रंथकारांनीं वाच्यार्थ्याचें ज्ञान, १ व्याकरण, २ कोश, ३ उपमा, ४ आदरवाक्य, ५ व्यवहार, ६ वाक्यशेष, ७ विवृत्ति (विवरण)