गोष्टी, संभाषण ह्यांत व दुस-याची समजूत घालून देण्याचे कामांत, लघु व निराकांक्ष वाक्येंच घालणें प्रशस्त आहे.
वाक्यांत, वाक्यदोष मानिले आहेत ते न येण्याची काळजी घेतली पाहिजे. ते हे: १ न्यूनपदता. २ अधिकपदता. ३ व्याकीर्ण. ४ समाप्तपुनरातत्व. ५ भग्नक्रम. ६ वाक्यगर्भ. ७ अरीतिमत, आणि ८ अविपृष्टविधेयांश. ह्यांचीं लक्षणें व उदाहरणें.
१.न्यूनपदता—ज्या वाक्यांत अन्वयबोधक असे एखादें पद मुळींच नसतें, तेथें हा दोष होतो. जसें--
१ 'त्यांनीं मोठी कीर्ति मिळवून शेवटीं विजयी झाला.'
२ 'त्याच्या बरोबरच्या सरदारास हें वर्तन रुचलें नाहीं'
ह्यांतील पहिल्या उदाहरणांतील वाक्यांत 'विजयी' शब्दाच्या मागें 'तो' हा शब्द आणि दुस-या वाक्यांत 'वर्तन' ह्या शब्दाच्या मागें 'त्याचें' हा शब्द पाहिजे. कारण त्यांच्यावांचून अन्वय बरोबर लागत नाहीं.
२.अधिकपदता--वाक्यांत ज्यांची अवश्यकता नाहीं असे निरर्थक शब्द घातले असतां हा दोष होतो. जसें--"त्यानें माझ्या हातांतील पुस्तक घेऊन विशाल पृथ्वीवर ठेविलें.”
येथें 'विशाल' शब्द घालण्याची अवश्यकता नसतां तो घातला असल्यानें अधिक आहे. किंवा जसें- “त्याच्या भाषणांत मार्दव होतें, पदाचें लालित्य होतें, अर्थगौरव होता, आणि चातुर्य ही होतें.”
पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/28
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११