पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

 मी त्या गोष्टीची यत्किंचित्ही कोणास ओळख न देतां, ही गोष्ट अधिक स्पष्ट न करण्याविषयीं तुह्मांसच युक्तीनें सुचविण्याचा अनेक प्रकारें केलेला प्रयत्न त्या वेळेस व्यर्थ गेला."
 निराकांक्ष. जसें--"रामभाऊ तेथें गेला नाहीं, हें मला आज समजलें, तेव्हां मला फार वाईट वाटलें, तरी मीं ही गोष्ट अद्याप रामभाऊस सांगितली नाहीं, असें आज माधवराव मला सांगत होता, हें खरें असेल असें मला खास वाटतें, तथापि मी त्याचा पक्का शोध करितों."
 ह्यांत जेथें जेथें स्वल्पविरामाचीं चिन्हें दिलीं आहेत, तेथें तेथें ह्या वाक्याचे तुकडे पाडितां येतात.
 वाक्यांत उद्देश आणि विधेय असे दोन अंश असतात. जसें--
 "हा घोडा काळा आहे.”
 ह्या वाक्यांत वक्त्यास घोड्यास उद्देशून काळ्या रंगाचें विधान करणें आहे. ह्यामुळे 'घोडा' हा उद्देश्य आणि काळा हें विधेय आहे असें समजावें.
 वाक्यें लहान किंवा मोठीं असणें व तीं साकांक्ष किंवा निराकांक्ष असणें, हें लेखनविषयांवर अवलंबून आहे. शास्त्रीय विषयाच्या, निबंधाच्या, किंवा ज्यांत भाषासौंदर्याकडे लक्ष देतां येतें, अशा विषयाच्या लेखांत बृहत्साकांक्ष वाक्यें उपयोगीं पडतात; परंतु तेंच इतिहास,