पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  "रामा आंबा खातो, गाय दूध देते."
 ह्यांत खाणें व देणें ह्या क्रिया सकर्मक असल्यामुळें 'आंबा' व 'दूध' हे दोन कर्मवाचक शब्द अधिक आले आहेत. ह्याच वाक्यांत नामें, सर्वनामें, विशेषणें, क्रियाविशेषणें, अव्ययें इत्यादि आणखी घातलीं ह्मणजे वाक्य अधिक विस्तृत होतें. अशा रीतीनें वाक्याचे दोन प्रकार होतात. एक लघु व दुसरा बृहत्. ह्याशिवाय साकांक्ष आणि निराकांक्ष असेही वाक्याचे दोन प्रकार आहेत.
 साकांक्ष-ज्या वाक्यांतील कांहीं अंश वाचला असतां, त्यांतील पूर्ण आशय समजण्यास्तव पुढें संपूर्ण वाक्य वाचण्याची आकांक्षा राहते, तें साकांक्ष वाक्य होय.
 साकांक्ष वाक्यांतही, १ अनेक वाक्यें मिळून झालेलें वाक्य, आणि २ एकच बृहत् वाक्य असे दोन पोटभेद आहेत.
 १. अनेक वाक्यें मिळन झालेलें वाक्य, जसें-- "ज्यानें आमचा अपमान केला, जो स्वभावानें हलका, ज्याला बोलण्याचा आदिपश्र्चात् विचार नाहीं, जो आमच्याशीं नम्रतेनें वागत नाहीं, त्यास आह्मीं बाळगावें असें जें तुह्मी आह्मास सांगतां तें कसें बरें व्हावें ?"
 २. एकच बृहत् वाक्य, जसें--"तुह्मी, त्याच गोष्टीला उद्देशून ह्या प्रसंगीं संभाषण करण्याचा उपक्रम आरंभीं केल्याचें तुमच्या भाषणाच्या झोंकावरून, हावभावावरून, व तिर्यक् दृष्टीवरून मला दिसून आालें असतांही,