पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  हा माधुर्यगुण काल, स्थलादिकांच्या वर्णनांत, प्रीति, शोक, इत्यादि कोमल मनोवृत्तीच्या वर्णनांत, आला असतां फार शोभतो.
 ३.संक्षिप्तत्व-- जेथें अभीष्टार्थ, होईल तितक्या थोड्या शब्दांत सांगितला असतो, तेथें हा गुण होतो. जसें--एका वर्तमानपत्रांत ह्मटलें आहे कीं, ‘सांप्रत आपल्या देशाची स्थिति मोठी शोचनीय आहे. राज्य परद्वीपस्थांचे हातीं; व्यापार विदेशीयांच्या हातीं; कृषीकडे आमच्या लोकांचें लक्ष नाहीं; आमचें शौर्य लयास गेलें; बुद्धीला मांद्य आलें; देशी कलांचा अस्त झाला; सर्व देश कंगाल झाला; लोकांतील शारीरिक शक्तीही नष्ट होऊन लोक हीनबल झाले; देशी राजे स्वसुखांतच मग्र आहेत; ज्या बाजूनें पहावें त्या बाजूनें आपली उन्नति होण्याचीं कांहींच चिन्हें दिसत नाहींत.” इत्यादि.
 ह्या लहानशा कलमांत हिंदुस्थानच्या सद्यःस्थितीचें थोडक्या शब्दांत संक्षेपानें चांगलें चित्र दाखविलें आहे.
 ४. उदात्त--विशेष्याला विशेषणें, यथायोग्य जेथें जशीं पाहिजेत तेथें तशीं दिलीं गेलीं असतां हा गुण होती. जसें--"महाराज सयाजीराव प्रजावत्सल, उदार, गुणग्राही, व दयाळू आहेत. ते राज्यावर बसल्यापासून त्यांनीं रयतेवरील अनेक कर कमी केले; कित्येक लोकांस हजारों रुपये मागील घेणें माफ केलें, दीन जनांच्या सुखाकरितां, लक्षावधि रुपये खर्च केले; देशोदेशींहून