पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "हें वर्तमान ऐकतांच तो घाबऱ्यावाणी पाहूं लागला.”
 ह्या वाक्यांत 'घाबऱ्यावाणी' हा शब्द अगदीं ग्राम्य आहे.
 लज्जाकारक शब्द ह्मणजे स्त्रीपुरुषांच्या गुह्यस्थानांचे वाचक शब्द. त्यांचीं उदाहरणें देण्यासही आह्मांस लाज वाटते. अलीकडे हे शब्द × × अशीं चिन्हें करून किंवा जागा रिकामी टाकून सुचविण्याची एक तऱ्हा निघाली आहे. पण आमच्या मतें, त्या शब्दांच्या उपयोगाचा प्रसंगच आणूं नये हेंच बरें.
 चिळस आणणारे शब्द, जसें-- "तो तेथेंच ओकला, मुतला व हगला, आणि कांहीं वेळानें मेला.”
 ह्यांत 'ओकणें' इत्यादिक शब्द चिळस उत्पन्न करितात. रसवर्णनप्रसंगीं तर ते घातलेच पाहिजेत; पण अन्यत्र अशाच प्रकारचा अर्थ सुचविण्याचें काम पडलें असतां, अशा ठिकाणीं संस्कृत भाषेतील प्रौढ शब्दांचा उपयोग करावा हें बरें.
  ६ अप्रतीत--जो अर्थ सुचविण्याकरितां शब्द योजिला, त्या अर्थाची, त्या शब्दापासून प्रतीतीच न झाली, तर हा दोष होतो. शास्त्रीय विषयाचे सांकेतिक शब्द किंवा देशविशेषांतच प्रसिद्ध असलेले शब्द, ह्यांचें, सर्वांस ज्ञान नसतें यामुळें, असे शब्द वाक्यांत आले असतां, त्यांचा अर्थ, सर्वांस कळेल अशी कांहीं योजना न केली तर हा दोष होती. जसें--‘गौणीनें