हा अर्थ कदापि निघणार नाहीं, तेथें व्यक्तीच मानिली पाहिजे."
किंवा दुसरें उदाहरण, जसें--"ती स्त्री त्या समयीं कुव्यावर उभी होती व तिच्या हातांत कंड्यासारखे कांहीं होतें."
ह्या वाक्यांत, पहिल्या उदाहरणांत, ‘गौणी१ व व्यक्ती२ ’ हे शब्द अलंकारशास्त्रांतील सांकेतिक आहेत, व दुस-या उदाहरणांत 'कुवा३ व कंडा४' हे शब्द माळव्यांतच मात्र प्रसिद्ध आहेत.
शब्दगुण पांच आहेत, ते हे:-प्रसाद, माधुर्य, संक्षिप्तत्व, उदात्त आणि समाधि. ह्यांचीं लक्षणें व उदाहरणें.
१. प्रसाद--वाक्यें वाचतां–बरोबर त्यांचा अर्थ मनांत येत जाईल अशा प्रकारचे सोपे, व्यवहारांतले, जेथें जसे पाहिजेत तसे, विशेषणें विशेष्याच्या अगदीं जवळ, वाक्यें लहान, अन्वय सहज समजण्यासारखा, असे शब्द वाक्यांत योजिले असतां, त्यापासून हा गुण उत्पन्न होती. जसें--
"उज्जनी नगरींत सत्यविक्रम नांवाचा एक राजा होता. तो मोठा शूर, दयाळु, न्यायी, आणि चतुर होता.
१. लक्ष्यार्थाची लक्षणावृत्ति-लक्ष्यार्थाचें वर्णन ह्याच ग्रंथांत अर्थसाधनांत आलें आहे. २. व्यंग्यार्थाची व्यंजनावृत्ति-व्यंग्यार्थाचेंही त्यांतच वर्णन केलें आहे. ३. विहीर. ४. गोवरी.