पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६

येत नाहीं. तथापि ह्या उदाहरणावरून त्या दिशेचें ज्ञान होईल.

 याशिवाय साहित्यदर्पणकारांनी वत्सल नांवाचा १०वा रस मानिला आहे. रा. रावजी मोडक यांनीं आपल्या साहित्यसार नांवाच्या ग्रंथांत भक्ति म्हणून ११ वा रस मानिला आहे. व रुद्रटकृत काव्यालंकारांत प्रेयान् नांवाचा १२ वा रस आढळतो.

------
अलंकार.

 भाषेला शोभा आणणारें जें चमत्कारयुक्त भाषण, त्यास अलंकार असें म्हणतात. हे मुख्यत्वेंकरून दोन प्रकारचे आहेत. १ शब्दालंकार आणि २ अर्थालंकार.

शब्दालंकार.

 केवळ शब्दरचनाविशेषांचा ज्यांत चमत्कार असतो, ते शब्दालंकार होत. ह्या शब्दालंकारांतील शब्दचमत्कृतींत जे प्रकार दृष्टीस पडतात, त्यांवरून ह्या चमत्कृतीचे ४ वर्ग करितां येतील; ते असे:--१ ध्वनिसाम्याच्या चमत्कृतीचा, २ अनेकार्थी शब्दांच्या अर्थचमत्काराचा, ३ गूढार्थाच्या चमत्कृतीचा आणि ४ पदार्थाच्या आकृतीप्रमाणें वर्णरचना करण्याचा ह्यांची लक्षणें व उदाहरणें.

१ ध्वनिसाम्याच्या चमत्कृतीचा वर्ग.

 एकदां शब्दांत किंवा वाक्यांत जे वर्ण येतात, तेच