पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०

हर्ष ह्या संचारीभावानें पुष्ट झाली. आणि हसणें, अश्रू येणें, इत्यादि अनुभावांनीं तिची पूर्णता व्यक्त झाली, म्हणून येथें हास्यरस झाला आहे.

 हा रस प्राधान्येंकरून प्रहसनांत येतो व नाटकादिकांत तो अंगभूत असतो. हास्यरसाचे स्वनिष्ठपरनिष्ठ असे दोन भेद आहेत.

 स्वनिष्ठ - पूर्व गोष्टींचें स्मरण झाल्यामुळें मनांतल्यामनांत हंसूं येतें तें.

 परनिष्ठ-दुसरा कोणी हांसत आलेला पाहून अथवा बाह्य चेष्टा करून शब्द ऐकूं येण्यासारखें जें हांसें तें.

 ह्याशिवाय हास्याचे आणखी ६ निराळे भेद आहेत, ते असे:-

 १ स्मित–गालांतल्या गालांत हसणें तें.

 २ हसित-किंचित् मुख विकासून हसणें तें.

 ३ विहसित-हसितापेक्षां जरा स्पष्टपणें दिसून येणारें व ज्यांत नेत्र मिटले जातात तें.

 ४ उपहसित–मान वगैरेचें हालणे, नाकादि मुखवयव फुलणें इत्यादि युक्त तें.

 ५ अपहसित-स्पष्ट हसूं ऐकूं येणें, अश्रु इत्यादि युक्त तें.

 ६ अतिहसित - हसतां हसतां, हातावर टाळी देणें, मोठ्यानें हसणें तें.

 ह्या वर दिलेल्या सहा भेदांचा उपयोग लेखकांनीं योग्य