पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
प्रौढा.

 ज्या लेखनपद्धतींत मार्मिक, औपरोधिक व उपहासयुक्त उक्ति असतात, जिच्यांत लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थाने इष्टार्थसूचना करण्याकडे लिहिणाराचा कल विशेष असतो, तीस प्रौढा असें म्हणावें.

 हिच्यांत ध्वन्यर्थास प्राधान्य असतें. जसें --

 "वाहवा! वाहवा! ज्ञानोदयमहाराज, तुम्ही धन्य खरे. तुमच्याच उदयामुळें व दीपिकेच्या प्रकाशामुळें आमच्या पुराण पुराणांतील भयंकर खळगे आम्हांस कळले, म्हणूनच आज जगलों. ह्या प्रकाशाचें साह्य आम्हांस नसतें तर खरोखरच, निबिडतर तिमिरस्तोमामुळें देवकीचा गर्भ रोहिणीच्या उदरांत प्रविष्ट झाला, कृष्णास गोकुळांत नेतांना पूर असलेल्या यमुनेनें वाट दिली व कृष्णानें वरुणापासून गुरूचा मृत पुत्र परत आणिला इत्यादि अनेक गप्पारूपी भयंकर कूपांत आम्ही पडून कुमारिकागर्भसंभूत, रक्तसिंधुभेदक, मरणोत्तर-पुनरुत्थानसमर्थ भगवान् येशू महाराजाच्या विविधचरित्रश्रवणेंकरून आमचे कर्ण पवित्र होते काय? व त्या पवित्र चरित्राच्या ठायीं आमचे मन रममाण होतें काय? तस्मात् तुमचे आमच्यावर महदुपकार आहेत."

 ह्या एकाच लेखांत, मार्मिक, औपरोधिक, उपहासयुक्त आणि व्यंग्यार्थयुक्त भाषण आहे.

समाप्त.