पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५
मधुरा.

 ज्या लेखनपद्धतींत इष्टार्थ नानाप्रकारच्या उक्तिवैचित्र्यांनी खुलवून दाखविला असतो ती मधुरा होय. हिच्यांत अलंकारास प्राधान्य असतें. जसें --

 "हें वर्तमान मला समजलें काय! जणों विषदिग्ध बाणच माझ्या हृदयांत लागला. तप्त लोहावर जलबिंदु पडला असतां, तो जसा एकदम खदखदूं लागतो, किंवा तीव्र अग्नीच्या योगानें जसें पाणी कढूं लागतें तसें माझें शरीर एकदम कढूं लागलें. त्या आवेशांत माझें देहभानच मी विसरलों व सर्पाच्या पुच्छग्रावर मनुष्याचा पाय पडला असतां, तो जसा फूं फूं करून एकदम त्यास दंश करण्यास धांवतो, त्याप्रमाणें मी तत्काळ हातांतील खङ्ग उपसून त्या दुष्टाच्या जवळ गेलों; आणि मोठ्या जोरानें नेमका त्याच्या मानेवर घाव मारून खरबुजाप्रमाणें त्याचें शिर धडापासून वेगळें केलें; पण मदिरापान केलेल्या मनुष्यास जसें आपण काय करितों हें कांहींच समजत नाहीं तद्वत् हें कृत्य देखील मी तशाच धुंदींत केलें; त्या योगानें कृत्य घडल्यानंतर कांहीं वेळानें जेव्हां माझा कोप अम्मळ शांत झाला, तेव्हां मला मीं काय कर्म केलें ह्याचा नीट वोध झाला. व जणुं काय मीं झोंपेंतूनच जागा झालों व मीं हें काम स्वप्नांतच केलें, असें मला वाटतें."

 ह्यांत अलंकार बरेच आले आहेत.